आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात अवैध मद्यविरोधी विशेष मोहिमेदरम्यान रविवारी (दि.१८) १७ ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली. यावेळी घटनास्थळावर आढळलेला गावठी दारू निर्मितीचा सुमारे ६०० लिटर आंबलेला द्रवपदार्थ नाशवंत असल्याने जागीच ओतून नष्ट करण्यात आला. तसेच ५२५ लिटर गावठी दारू व देशी-विदेशी दारूच्या २३५ सीलबंद बाटल्या जप्त केल्या. या सर्व मद्याची किंमत अंदाजे एक लाख सात हजार ८१५ रुपये आहे. याप्रकरणी संबंधीत पोलिस ठाण्यात १७ गुन्हे दाखल करण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सात ठिकाणी छापे टाकले. यात उस्मानाबाद (ग्रा.) ठाणे हद्दीत गावसूद ग्रामस्थ संगीता काळे व छायाबाई पवार आपापल्या घरासमोर ९५ लिटर गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या. मुरुम ठाणे हद्दीत यशवंतनगर, मुरुम येथील विजय शिर्के ४० लिटर गावठी दारू बाळगलेले, तर नाईकनगर तांडा येथील माणिक आडे सुंदरवाडी शिवारात ७० लिटर गावठी दारू सापडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.