आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयत्नशिल:रामतीर्थ येथे डॉक्युमेंटरीसाठी चित्रण; प्रभू श्रीरामचंद्रांच्या वास्तव्याचे पुरावे देण्याचा प्रयत्न

नळदुर्ग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेस मीडिया आणि अॅपालॉज एटरटेनमेंटद्वारा तयार करण्यात येत असलेल्या “फाईंडिंग राम-इन द फुटस्टेप ऑफ राम” या डॉक्युमेंट्रीचे चित्रीकरण ९ मे रोजी नळदुर्ग येथील रामतीर्थ येथे करण्यात आले. अभिनेता अपराजित खुराणा हे अयोध्या ते श्रीलंका या मार्गावर जिथे, जिथे प्रभू श्री रामचंद्र वनवास गमन काळात गेले आहेत त्या, त्या ठिकाणी जाऊन त्याचे चित्रीकरण करून त्यावर डॉक्युमेंट्री बनवित आहेत.

नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ येथे वनवास काळात श्री प्रभु रामचंद्र दोन वेळेस येऊन गेले आहेत.त्यामुळे अपाराजित खुराणा यांनी ९ मे रोजी श्री क्षेत्र रामतीर्थ येथे येऊन मंदिर व परिसरात चित्रीकरण केले. यावेळी श्री क्षेत्र रामतीर्थ देवस्थानचे महाराज श्री विष्णु प्रसाद शर्मा महाराज यांनी चित्रीकरणाच्यावेळी अभिनेता अपराजित खुराणा यांना मंदिराची संपूर्ण माहिती सांगितली. यावेळी सचिन डुकरे, अॅड. धनंजय धरणे, प्रभाकर घोडके, रोहित मोटे उपस्थित होते. सध्या महंत विष्णु शर्मा महाराज व त्यांचे सहकारी परिसर विकासासाठी कार्यरत आहेत. पावसाळयात हा परिसर हिरवागार मोहरतो आणि पर्यटकांची गर्दी वाढते.

बातम्या आणखी आहेत...