आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित:परमेश्वरी देवीची छबिना मिरवणूक ; बकऱ्याच्या अजाबळीचा विधी संपन्न

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कुंभारवाडा येथील श्री क्षेत्र परमेश्वरी माता देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंगळवारी (दि.४) रात्री देवी मंदिरापासून भव्य छबीना व पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. बुधवारी (दि.५) पहाटे हलगी-ढोलाच्या निनादात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पुजारी तुकाराम कुंभार यांच्या हस्ते बकऱ्याच्या अजाबळीचा विधी संपन्न झाला.

उमरगा शहरातील कुंभारवाडा येथील परमेश्वरी माता देवी मंदिरात बुधवारी रात्री प्रारंभी तलवार आणि पालखी पुजा करण्यात आली. देवी मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षा शकुंतला मोरे, एल. टी. मोरे यांच्या हस्ते भवानी मातेच्या मूर्तीची विधिवत पूजा अन् आरती झाल्यानंतर छबिना मिरवणुकीस प्रारंभ झाला. भव्य पालखी व छबीना मिरवणुकीत हातात पोत, गळ्यात कवड्यांची माळ, सोबत धनगर बांधवांच्या ढोलचा निनाद आणि आई राजा उदो उदो.. सदानंदचा उदो उदो... बोल भवानी माता की जय... अशा नामघोषात आराधी मंडळी, महिला व हजारो भाविक श्री देवीच्या भक्ती रसात तल्लीन झाले होते. हजारो युवकांनी हलगी आणि बँजोच्या तालावर जल्लोष साजरा केला. छबिना मिरवणूक शहरात जुनीपेठ, भीमनगर ते राष्ट्रीय महामार्गावरुन शिवाजी चौक, महादेव मंदिरापासून पुन्हा परत देवी मंदिरापर्यंत आल्यावर बकऱ्याच्या अजाबळीचा विधी आणि अग्नी प्रवेश झाला.

ट्रस्टचे राजू कुंभार, विठ्ठल कुंभार, बाबा कुंभार, ज्योतीबा कुंभार, किशोर शिंदे, ज्योतिबा शिंदे, दिलीप तेलंग, भरत भोसले, नागेश तेलंग, शाहुराज शिंदे, विजयकुमार पाटील, कल्लशेटी पाटील नवरात्र महोत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, आकाश शिंदे, बाबूराव सुरवसे, नीलकंठ कुंभार, गिरीश पाटील, चंद्रकांत कुंभार, दत्ता घोडके, चंद्रकांतराव मजगे, करबस शिरगुरे, कैलास शिंदे, देवा जाधव, दिनेश शिंदे, विनोद कोराळे, दत्ता शिंदे, अविनाश जोशी, निलेश काळे आदींनी छबीना मिरवणूक यशस्वितेसाठी पुढाकार घेतला. दरम्यान बाळासाहेब माने, धनंजय मुसांडे, धनराज कांबळे, श्री. भुजबळ आदींनी छबिना मिरवणुकीत सहभाग घेतला. पालखी मार्गावर शंकर हेबळे, बिरू हेबळे, संतोष हेबळे, हेबळे परिवार व माने परिवाराच्या वतीने भाविकांना मोफत चहापाण्याची सोय करण्यात आली होती.

कोळीवाडा देवी मंदिर
शहरातील कोळीवाडा येथील देवीच्या छबिना मिरवणुकीत असंख्य भाविक सहभागी झाले होते. पुजारी ईश्वर कावाले यांच्या हस्ते अजाबळी देण्यात आला. महोत्सव समितीचे प्रविण मोरे, राजु सगर, बमचंडे, अमर वरवटे, अमर चव्हाण, प्रकाश वजनम, ॲड. एम. पी. कोथिंबिरे आदींनी यासाठी पुढाकार घेतला.यावेळी मानकरीही उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...