आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:तेरणा साखर कारखान्याचा ताबा तत्काळ भैरवनाथ शुगरला द्या; पाच दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

उस्मानाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्ज वसुली न्यायाधिकरणाच्या (डीआरटी कोर्ट) आदेशानुसार तेरणा साखर कारखान्याचा ताबा तत्काळ भैरवनाथ शुगर्सला देण्यात यावा. अन्यथा पाच दिवसानंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पक्षाच्या वतीने दिला आहे.

ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यासंदर्भातील जिल्हा बँकेने राबवलेली निविदा प्रक्रिया योग्य असल्याचा निर्वाळा डीआरटीने दिलेला आहे. त्यामुळे आता विलंब न करता तेरणा साखर कारखान्याचा ताबा तात्काळ भैरवनाथ शुगरला देण्यात यावा, येत्या ५ दिवसामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने तातडीची बैठक घेऊन तेरणा कारखान्याचा ताबा भैरवनाथ शुगर यांना देऊन तात्काळ कारखाना सुरू करण्याची कार्यवाही करावी, अन्यथा आम आदमी पार्टी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अजित खोत यांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत भुतेकर, संजय दणाणे, जिल्हा कोषाध्यक्ष विकास वाघमारे, युवक उपाध्यक्ष मोहसीन मिर्झा, मीडिया विभागप्रमुख प्रा. चाँदपाशा शेख, शहराध्यक्ष बिलाल रजवी, शहर सचिव नामदेव वाघमारे, शहाजी पवार, अंकुश चौघुले, नितीन अलकुंटे, राजपाल देशमख, महेबुब शेख यांची स्वाक्षरी आहे.

बातम्या आणखी आहेत...