आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:राज्यपाल कोश्यारी यांना तत्काळ कार्यमुक्त करा; कळंबमध्ये काँग्रेसचे निवेदन

कळंब8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कार्यमुक्त करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्य करुन महाराष्ट्र व मराठी माणसाचा अपमान केला आहे.

या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तारेक मिर्झा, राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण सेल प्रदेश उपाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे, राष्ट्रवादी युवक प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंतनु खंदारे, राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष बालाजी भातलवंडे, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष भीमा हगारे, उमेश मडके, राष्ट्रवादी जलसंधारण सेल तालुकाध्यक्ष अशोक जगताप, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका कार्याध्यक्ष अतुल धुमाळ, हाजेब बागवान आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...