आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम:परंडा तालुका व शहर परिसरात विसर्जन मिरवणूक

परंडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका व शहर परिसरात अनंत चतुर्थी च्या दिवशी विविध गणेश मंडळांनी “गणपती बप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” जयघोष करीत फुलांची तसेच गुलालाची उधळण करीत लेझीम पथक, ढोल ताशा व बँडच्या वाद्यात “श्री”ची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. शहरातील परवानाधारक गणेशमंडळाची संख्या १४ असून मंडळाने “श्री” ची प्रतिष्ठापना करून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले.जय भवानी गणेश मंडळ, बालवीर गणेश मंडळ, समर्थ गणेश मंडळ, जय मल्हार गणेश मंडळ, गारभवानी गणेश मंडळ, नरवीर गणेश मंडळ, श्री शिव छत्रपती गणेश मंडळ, जय हनुमान टेंबे गणेश मंडळ, मोरया गणेश मंडळ, नृसिंह गणेश मंडळ आदीनी यात भाग घेतला. तर गुरुवारी (दि.८) हंसराज गणेश मंडळ, विठ्ठल गणेश मंडळाच्या वतीने “श्री” ची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. शिवछत्रपती गणेश मंडळाने श्री मिरवणुकीतील मंडळाच्या पदाधिकारी व नागरिकांना अल्पोहाराची व्यवस्था केली होती.

तालुक्यातील परंडा हद्दीत ४७ परवानाधारक गणेश मंडळानी “श्री” ची प्रतिष्ठापना केली होती. मिरवणूक शांततेत पार पडली असून पोलिस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ४० गृहरक्षक दल, ५५ पोलिस कर्मचारी व ६ अधिकारी बंदोबस्त ठेवण्यात आला होता नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने शहरात तीन ठिकाणी विसर्जनासाठी सोय करण्यात आली होती. तीन तलावाच्या ठिकाणी पोलिस कर्मचारी व स्वीमर ठेवण्यात आले होते.विसर्जन मिरवणुक दरम्यान मंडई पेठेत मुस्लिम समाजाच्या वतीने इरफान शेख, रियाज पठाण, इप्पु सौदगर यांनी विविध गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला.

बातम्या आणखी आहेत...