आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र शासनाने गेल्या आठवड्यातच उस्मानाबाद शहराचे नाव, धाराशिव करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहेत. त्यानंतर सर्वात अगोदर अंमलबजावणी महामंडळाकडून करण्यात येत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे मंगळवारी सायंकाळी आदेश येताच बुधवारी त्यानुसार कारवाई सुरु करण्यात आली असून दुपारपर्यंत १५ पेक्षा अधिक बस गाड्यांवरचे आगाराचे नाव बदलेले होते. वेळापत्रक आणि बस स्थानकाचेही नाव बदलले असल्याचे दिसून आले. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयावर केंद्र शासनाने २४ फेब्रुवारी अंतिम शिक्कामोर्तब केले आहेत.
त्यानंतर राज्य शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पुन्हा दुसरे आदेश काढून २७ मार्च नंतर नामांतराची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे समोर आले. त्यासाठी ज्यांना या नावावर सुचना, हरकती घ्यायच्या आहेत. त्यांना एक महिन्याचा वेळ दिला आहे. विशेष म्हणजे नामांतर करायच्या नंतरची सर्व प्रक्रिया नियमानुसार करण्यासाठी शासनाने नागरिकांकडून सुचना मागवल्या आहेत. परिणामी यासाठी एक महिन्याचा अवधी लागणार आहे. त्यानंतरच यावर अंतीम राजपत्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
कायमस्वरुपी नाव देणार
महामंडळाच्या इमारतीसह गाड्यांवरील आगाराचे नाव तसेच गाड्यांच्या नावांच्या पाट्या बदलण्यासाठी सद्या किंवा तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी धाराशिव नावाचे स्टिकर लावण्यात येणार आहे. नंतर हळूहळू स्टिकर काढून कायमस्वरुपी हे नाव राहण्यासाठी बॅनर किंवा पेंट करुन ते नाव लिहीणार आहे. या सर्व कामांसाठी २० हजार रुपये खर्च अपेक्षीत आहे.
शासनाकडून आदेश आले
शासनाकडून धाराशिव नावाची अंमलबजावणी करण्यासाठी मंगळवारी शासनाकडून आदेश आले आहेत. त्यानंतर तातडीने आमच्याकडून जिल्ह्यातील सर्व आगाराच्या बसेसच्या पाटीवरील उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याची सुचना दिली आहे. तसेच इमारत आणि अन्य सर्व ठिकाणचे नाव बदलण्यात येत आहेत.
गाड्यांवरील आगाराची नावे बदलली, स्टिकर्स तयार
आमच्या आगारातील ८६ पैकी ७० बसेस सद्या आगारात असून दुपारपर्यंत १५ पेक्षा जास्त गाड्यांवरील आगाराचे नाव बदलले. पाट्यांवरील नाव बदलण्यासाठी स्टिकर तयार करण्यात आले आहे. त्यामुळे दोन दिवसांत पाट्या आणि गाड्यांवरील आगाराचे नाव बदलण्यात आले आहेत.- हर्षल बलसोडे, आगार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.