आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील शरणप्पा मलंग विद्यालयात दहावीच्या उन्हाळी वर्गाला सोमवार (०४) पासून सुरुवात झाली असल्याच्यानिमित्ताने आयोजित माता-पालक यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शालेय शिक्षण समिती अध्यक्ष एस के मलंग अध्यक्षस्थानी होते.
यावेळी मार्गदर्शक डॉ सुचिता पोफळे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. एम एस मलंग, ज्येष्ठ सदस्य व्ही के पाटील, कुमारस्वामीचे मुख्याध्यापक कविराज रेड्डी, मुख्याध्यापक अजित गोबारे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ सुचिता पोफळे म्हणाल्या की, किशोरवयीन मुलांना समजून घेत असताना पालकांची प्रमुख भूमिका आहे. वादळी वयातील विद्यार्थी बदलू शकत नाहीत तुम्ही स्वतःमध्ये बदल करून घेण्याचे आवाहन केले. यावेळी मुलगा अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, विद्यार्थी वर्गामध्ये गोंधळ घालतात, मोबाईलमध्ये वेडे झाले आहेत काय आणि विद्यार्थ्यांत शिस्त, अभ्यासूवृत्ती नाहीशी होत चालली आहे अशा अनेक प्रश्न विचारलेल्या पालकांना सुसंवाद साधून त्यांचे शंकासमाधान डॉ. पोफळे यांनी केले.
मुख्याध्यापक अजित गोबारे यांनी कोरोनामध्ये विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यास उन्हाळी अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यात आले असून विद्यार्थ्याचे वर्तनात होणारे परिवर्तन लक्षात घेऊन शाळेमध्ये स्वयंशिस्त व उच्चप्रतीचे संस्कार विद्यार्थ्यांना देऊन आदर्श विद्यार्थी बनविण्यासाठी प्रत्येक पालकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. यावेळी पालक ॲड राजेंद्र मंडले, शीतल बर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. या दरम्यान द्वितीय सत्र चाचणी परीक्षेत मराठी व सेमीमधून प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळावा यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक राजकुमार जाधव, अगतराव मुळे, विवेकानंद पाचंगे, बालाजी हिप्परगे, परमेश्वर कोळी, श्रीमती प्रभावती बिराजदार, श्रीमती मीनाक्षी हत्ते, कलशेट्टी पाटील, मोहन साखरे आदींनी परिश्रम घेतले. शिक्षक परमेश्वर सुतार यांनी सुत्रसंचलन केले. सतीश कटके यांनी आभार मानले.
चांगले मित्र व्हा
प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते त्यामध्ये गैर काही नाही. पण तू असंच केले पाहिजे, तसाच केले पाहिजे असे सतत हुकूम सोडून त्यांचे मालक होऊ नका तर त्यांचे चांगले मित्र म्हणून त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांचे मनात व डोक्यातील बौद्धिक कल लक्षात घेत त्यांचे पालक व्हा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.