आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात २३ ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या चौथ्या दिवसापर्यंत २३ ग्रामपंचायतीमध्ये ६७ सदस्यासाठी आणि १७ सरपंचासाठी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी (२) अखेरचा दिवस असल्याने नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास मोठी गर्दी होणार आहे.तालुक्यात मुदत संपुष्टात आलेल्या २३ ग्रामपंचायत गावात निवडणूक होत असून प्रक्रीया सुरू झालेली असून बुधवारी (दि ३०) तीन गावात सहा सदस्य तर एक सरपंच पदासाठी अर्ज दाखल झाला होता. गुरूवारी १२ ग्रामपंचायतीत ६१ सदस्यासाठी तर १६ सरपंचासाठी असे एकूण सरपंचासाठी १७ अर्ज व ६७ अर्ज सदस्यासाठी दाखल झाले असून आज शेवटचा दिवस असल्याने नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास मोठी गर्दी होणार असून अर्ज दाखल करण्यास सायंकाळी साडेपाच पर्यंत वेळ असणार आहे.
तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीस प्रत्यक्षात सुरुवात झाली असून सोमवारी (दि २८) पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झालेली असून दोन डिसेंबरपर्यंत (सुट्टी वगळून) नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहेत. नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर ते दोन डिसेंबर कालावधीत दाखल करण्यात येतील. मागील तीन दिवसात कलदेव निंबाळा दोन, मळगी एक तर औराद तीन असे सहा अर्ज दाखल झाले व औराद येथे सरपंच पदासाठी एक नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते.
गुरूवारी कलदेव निंबाळा सरपंचासाठी एक व सदस्यासाठी एक. त्रिकोळी सरपंच एक, सदस्यासाठी दोन, कोथळी एक सरपंच, आठ सदस्य,धाकटीवाडी एक सरपंचासाठी. भुयार चिंचोली/काटेवाडी दोन सरपंच व सहा सदस्यासाठी, औराद सरपंच एक, सहा सदस्य. येणेगूर एक सदस्यासाठी, एकुरगा/वाडी दोन सरपंच, चार सदस्यासाठी. कोराळ आठ सदस्यासाठी, आलूर दोन सरपंच तर १७ सदस्यासाठी, माडज प्रत्येकी एक. वरनाळवाडी एक सरपंच, सहा सदस्य. सुंदरवाडी एक सरपंचासाठी. मळगीवाडी सरपंचपदासाठी दोन अर्ज. तर महालिंगरायवाडी येथे एक सदस्यासाठी अर्ज दाखल झाला आहे. गुरूवारी १२ गावात सरपंचासाठी १६ व सदस्यासाठी ६१ अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत १८ ग्रामपंचायतीत १७ अर्ज सरपंच पदासाठी तर ६७ अर्ज सदस्य पदासाठी दाखल झाले असून सात ग्रामपंचायतीत एकहि अर्ज दाखल झाला नाही.
अर्ज दाखल करण्यास आज शेवटचा दिवस असल्याने त्यात ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार असून मोठी गर्दी होणार आहे. तालुक्यात २३ ग्रामपंचायतच्या २३ सरपंचासह ८४ प्रभागात २३३ असे एकूण २५६ जागेसाठी किती अर्ज येणार हे उद्या स्पष्ट होईल.बिनविरोध ग्रामपंचायत काढण्यासाठी २३ गावात बैठकी सुरू असून बिनविरोधची चर्चा लांबणीवर जात असली तरी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी खरे चित्र स्पष्ट होणार आहे. गावपुढारी आणि पॅनेल प्रमुखांना सरपंचासह सदस्य निवडीसाठी कसरत करावी लागत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.