आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिक्षा:अणदूर मठात 80 बटूंना दीक्षा तर अकरा जणांना अय्याचार

अणदूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री निलकंठेश्वर मठात मठाधिपती श्री. ष. ब्र. शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांनी ८० बटूंना दिक्षा तर ११ जंगम बटूंना अय्याचार दिला.येथे श्रावण महिन्याचे औचित्य साधून शनिवारी (दि.२०) मठाधिपती शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांनी बटूंना दिक्षा व अय्याचार संस्कार दिला. मानव धर्माचा विजय असो, धर्मानेच विश्वाला शांती, असा संदेश देणाऱ्या वीरशैव लिंगायत धर्मात गुरुवर्याकडून मंत्रोपदेश ग्रहण करून व गळ्यात शिवलिंग धारण करून दिक्षा घ्यावी लागते. गुरूचे स्थान असलेल्या जंगमास अय्याचार घ्यावा लागतो. वीरशैव लिंगायत धर्मात या विधीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावेळी सद् भक्तांनी महास्वामीजींचा जयजयकार केला. कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदमूर्ती प्रा. विवेकानंद स्वामी यांनी केले. कार्यक्रमानंतर सद् भक्तांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कल्याणी मुळे, चंद्रकांत नरे, सोमनाथ डांगे, रवी चरंतीमठ, गुरय्या स्वामी आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...