आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:बुद्धिबळात रितू तालुक्यातून तिसरी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शरणाप्पा मलंग विद्यालयात झालेल्या तालुकास्तरीय योग व बुद्धिबळ स्पर्धेत भारत विद्यालयाची रितू चव्हाण हिने दमदार कामगिरी केल्याने ती जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. रितू हिने बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातून उत्कृष्ट खेळी करत तालुक्यातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. याची दखल घेत तिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली.

यशाबद्दल संस्थाध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे, संचालक व मुख्याध्यापक शाहुराज जाधव, पर्यवेक्षक विक्रांत मोरे, पर्यवेक्षक संजय देशमुख यांनी अभिनंदन केले. तिला क्रीडाशिक्षक विक्रांत मोरे व सहशिक्षक संदीप चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. गुरुवारी (दि.१) विद्यालयाच्या वतीने यशस्वी खेळाडू व मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहशिक्षक व्यंकट गुंजोटे, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...