आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:एकुरगा शिवारात कृषी अधिकारी थेट बांधावर ; विविध शेतकऱ्यांना अडचणींबाबत मार्गदर्शन

उमरगा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील एकुरगा येथे “माझा एक दिवस बळीराजासाठी’ याउपक्रमातून शेतकरी सुधीर पाटील यांच्या शेतावर जावून शुक्रवारी शेती शाळा घेण्यात आली. शेती शाळेला तालुका कृषी अधिकारी सागर बारवकर यांनी मार्गदर्शन केले.तालुका कृषी विभाग शेती शाळेस उमेद कृषी व्यवस्थापक किशोर औरादे, पोलीस पाटील महेशंकर पाटील, सदस्य अनिल जाधव, कृषी सहाय्यक किरण ढोकळे,शरद आरेकर किशोर करके, शिवानंद करके, अंगद गायकवाड शेतकरी उपस्थित होते. कृषी अधिकारी सागर बारवकर यांनी ड्रॅगन फूड, सिताफळ बाग, शेततळे व शेततळ्यातील मासे पालन याची पाहणी करून शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीत असलेल्या समस्येविषयी चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल जाधव यांनी पशुधन वाढविण्या बाबत सुचविले, महेश पाटील यांनी सहकार क्षेत्र वाढवणे गरजेचे आहे असे सांगितले. उमेद कृषी व्यवस्थापक किशोर औरादे यांनी वीज वितरण कंपनीची वीज दिवसा किमान आठ ते दहा तास नियमित मिळावी, राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकऱ्यांना हेलपाटेन घालता लवकर कर्जाचे वितरण करावे, आदी विषयावर गटचर्चा करण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी बारवकर यांनी शेतकऱ्यांतून गटचर्चामधून उपस्थित प्रश्नांची माहिती घेवून संबंधित सर्व विभागाला पत्राद्वारे कळविण्यात येईल असे सांगितले. ही बांधावरची शेती शाळा खेळीमेळीच्या वातावरणात घेण्यात आली.

नैराशाबाबत मार्गदर्शन शेतकऱ्यांनी खचून न जाता शेतीपूरक व्यवसाय करण्याची अनेक विषयाची माहिती देवून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. शेतकऱ्यांच्या नैराश्यावर उपाययोजना यावरती गटचर्चा करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी, नैसर्गिक आपत्ती आदीबाबत मार्गदर्शन व उपाययोजना करण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...