आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:न्यू व्हिजन मध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या‎ वेशभूषा तर माता मालकांनी रांगोळ्या‎

लोहारा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नूतन वर्षाचे स्वागत व क्रांतिज्योती‎ सावित्रीबाई फुले यांच्या‎ जयंतीनिमित्त लोहारा येथील न्यू‎ व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये सोमवारी‎ (दि.२) विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा‎ आणि माता पालकांची रांगोळी व‎ डिश डेकोरेशन स्पर्धा उत्साहात‎ संपन्न झाल्या.‎ या स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण‎ विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण‎ यांच्या हस्ते झाले. यावेळी‎ नगरसेविका मयुरी बिराजदार,‎ आरती कोरे, माजी जि. प. सदस्या‎ मीरा फुलसुंदर, सरिता बहनजी,‎ रंजना हासुरे, परीक्षक विद्या‎ मक्तेदार, सचिन शिंदे, प्राचार्य‎ शहाजी जाधव यांची प्रमुख‎ उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते‎ सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन‎ झाले.

मान्यवरांना पुस्तक भेट देवून‎ सत्कार केला. प्रास्ताविकात शहाजी‎ जाधव म्हणाले की, दि. २६ डिसेंबर‎ ते १ जानेवारी या सात दिवसांत‎ स्कूलमध्ये रेंबो वीक सेलिब्रेशन‎ निमित्त हस्ताक्षर, चित्रकला, गीत‎ गायन, पाठांतर, क्रीडा स्पर्धा घेण्यात‎ आल्या. सुभाष चव्हाण म्हणाले की,‎ लहान वयात विद्यार्थ्यांना काय‎ करावे व काय करू नये, हे सांगून‎ प्रत्यक्ष अनुभवातुन शिक्षण द्यावे.‎ माता पालकांना मार्गदर्शन करताना‎ सरिता बहनजी म्हणाल्या की,‎ पाल्याला पालकांनी मोबाइलपासून‎ दूर ठेवून प्रेम, जिव्हाळा वाढवावा.‎

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शेतकरी,‎ सैनिक, डॉक्टर, वकील,‎ इंजिनिअर, शिक्षक, संत ज्ञानेश्वर,‎ संत तुकाराम, संत गाडगे महाराज,‎ स्वामी समर्थ, छत्रपती शिवाजी‎ महाराज, संभाजीराजे, डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू,‎ झाशीची राणी, सावित्रीबाई फुले,‎ जिजाऊ, आदिवासी बांधवांच्या‎ वेशभूषा साकारुन उपस्थितांची मने‎ जिंकली. मास्क वापरा,‎ सॅनिटायझरचा उपयोग करा, असे‎ सांगत कोरोनाबाबत जागृती केली.‎

एका विद्यार्थ्याने नवरदेवाच्या‎ वेशभूषेत ‘मला बायको मिळेल का‎ हो? यातून तरुणांची व्यथा मांडली.‎ माता पालकांनी डिश डेकोरेशन‎ स्पर्धेत विविध पदार्थ बनवले.‎ रांगोळीतून मुलगी शिकवा, पाणी‎ वाचवा, झाडे लावा, असा संदेश‎ दिला. सूत्रसंचालन माधवी होगाडे,‎ सरिता पवार यांनी तर सविता जाधव‎ यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी‎ सिद्धेश्वर सुरवसे, सोमनाथ‎ कुसळकर, व्यंकटेश पोतदार,‎ प्रेमदास राठोड, मयुरी नारायणकर,‎ मीरा माने, संतोषी घंटे, चांदबी‎ चाऊस, निलोफर बागवान,‎ स्वामीनी होंडराव, शिवानी बिडवे‎ यांनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...