आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुका शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यास मुहूर्त मिळेना यावर्षीच्या शिक्षक पुरस्कारांची यादी जाहीर अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,परंडा तालुका शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम त्वरीत घेऊन निकषपात्र शिक्षक बंधू भगिनी यांना सन्मानित करावे.तालुका शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम ५ सप्टेंबर शिक्षक दिनी घेऊन पुरस्काराचा व शिक्षकांचा सन्मान वाढविला पाहिजे. दोन महिने झाले तरी तालुका शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम अद्यापही रखडलेलाच आहे.
सन २०२३ पासून तालुका शिक्षक पुरस्कारासाठी १ महिना अगोदर जाहीररीत्या प्रस्ताव मागवावे नि पारदर्शीपणे व कोणत्याही हित संबंधांना थारा न देता निवड प्रक्रिया राबवून निवड यादी जाहीर करावी व पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम ५ सप्टेंबर शिक्षक दिना दिवशीच घेण्यात यावा. पुरस्काराचा व शिक्षकांचा सन्मान राखावा अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल.ज्या त्या वेळेस त्या त्या त्या गोष्टीचे महत्व असते, त्यामुळे असे कार्यक्रम वेळेत झाले पाहिजेत असे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर प्रहार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत,जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, जिल्हा नेते संतुक कडमपल्ले, तालुका अध्यक्ष विनोद सुरवसे आदीसह पदाधिकारी यांची स्वाक्षरी आहे.
प्रस्ताव का मागवतात?
गट शिक्षण कार्यालयाने तालुका शिक्षक पुरस्कार निवड यादी अद्यापही जाहीर केलेली नाही. पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम घेणे तर दूरच शिक्षक बंधू-भगिनी यांचे कौतुक करण्यास प्रशासनाकडे वेळ नाही.गुणवान व निकषपात्र शिक्षकांना शाबासकी देण्याची आवश्यकता गट शिक्षणाधिकारी यांना वाटत नाही. मग पुरस्कारासाठी प्रस्ताव का मागवले जातात हा प्रश्न आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.