आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवारात युवा शेतकऱ्यांनी प्रयोगशिल शेतीकडे वाटचाल सुरू केली आहे. यावर्षी पहिल्यांदाच आपल्या शेतात शंभर एकरावर कोथिंबिरीची लागवड केली असून या माध्यमातून आर्थिक समृद्धी साधली आहे.
उसाला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन या नगदी पिकाची निवड केली होती. सध्या पावसाचे प्रमाण चांगले असल्याने पुन्हा शेतकऱ्यांनी उसाला पसंती दिली. परंतु, उसाचे अतिरिक्त क्षेत्र झाल्याने १८ महिने उसाला सांभाळूनही उस गाळपाला जात नाही. सोयाबीन पेरले तर अतिरिक्त पावसामुळे नुकसान होते. यामुळे यावर्षी गावातील सुशिक्षीत युवा शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करण्यास सुरवात केली आहे. ४० युवा शेतकऱ्यांनी एकत्र येत या शिवारात अभ्यासपूर्ण शेती करत शंभर एकरावर कोथिंबीरीची लागवड केली आहे. हे शेतकरी इतर शेतकऱ्यांनाही कोथिंबिरीबाबत मार्गदर्शन करत आहेत. ४० दिवसांचे हे कोथिंबिरीचे पीक असून व्यापारी स्वतः शेतात येवून याची खरेदी करतात. कमी परिश्रमास चांगले उत्पन्न मिळवून देण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी कोथिंबीर लागवडीस कल दिला आहे.
कमी अवधीत उत्पन्न देणारे पीक, पारंपरिक पीक पद्धतीस फाटा
धनीयासे बने धनवान ग्रुप
४० युवा शेतकऱ्यांनी कोथिंबीरीची लागवड केली असून त्यांच्यात समन्वयासाठी धनीयासे बने धनवान हा व्हाॅटसअॅप ग्रुप तयार केला आहे.या ग्रुपच्या माध्यमातून कोथिंबिरीच्या पेरणीपासून ते विक्रीपर्यंत येणाऱ्या समस्या व त्याचे निराकरण याची चर्चा हे युवा शेतकरी करतात. समूह शेतीमुळे या शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होताना दिसून येत आहे.
४० दिवसांचे चक्र
कमी कालावधीत चांगले उत्पादन मिळवून देणारे कोथिंबिरीचे पीक आहे. एक प्लॉट गेला की लगेचच तिथे पुन्हा कोथिंबीरीची लागवड आम्ही शेतकरी करत आहोत. चाळीस दिवसात शेतकऱ्यांकडे या उत्पादनामुळे आर्थिक चक्र सुरळीत फिरत आहे.
-सुरेश महाजन, शेतकरी.
युवा शेतकऱ्यांचा पुढकार
प्रयोगशिल शेतीतून समृध्दीसाठी गावातील अमोल सुडके, सुरेश महाजन, नामदेव माकोडे, अवधू्त टेळे, अतिक दखणी, मयुर व्यवहारे, आकाश धाकातोडे, नितीन सुडके, दत्ता महाजन, रुषीकेश वाघमारे, धनराज ठाकूर, बाबा दखनी, विशाल संगवे, पांडुरंग महाजन, इमाम डांगे, गणेश पाटील यांच्यसह ४० शेतकऱ्यांनी कोथिंबिरीच्या समूह शेतीसाठी पुढाकार घेतला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.