आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम:गणेशाेत्सव मंडळांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनाचीही तयारी सुरू; विविध गणेशाेत्सव मंडळांच्या वतीने आयोजित स्पर्धांना प्रतिसाद

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दहा दिवसांच्या गणपतींचे शुक्रवारी विसर्जन होत असून जिल्ह्यात विविध गणेश मंडळांच्या वतीने सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम चालू आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतींच्या वतीने विसर्जनासाठी तयारी चालू आहे. परंडा जय भवानी गणेश मंडळ परंडा शहरातील जय भवानी गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त आयोजीत विविध वयोगटातील डान्सस्पर्धेत मंगळवार (दि.६) बालकलाकारांनी, शालेय मुलामुलींनी बहारदार नृत्य अविष्कार सादरीकरण करुन उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

लहान मोठ्या वयोगटात लिंबु चमचा,संगीत खुर्ची, पोत्यातुन उडी मारणे आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. शहरातील बालकलाकार, मुलामुलींच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी डान्सस्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचा शुभारंभ समीर पठाण यांच्या हस्ते करण्यात आला. डान्सस्पर्धेत हिंदी मराठी गीतासह लावणी नृत्यकला,मल्हारी गीतावर कलाकारांनी धमाल उडवित स्पर्धेत मोठी रंगत आणली.या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणुन चित्रपट संगीतकार डॉ.जयभीम शिंदे,भरतनाट्यम नृत्य शिक्षिका अर्चना भोत्रेकर,नृत्यदिग्ददर्शक शुभम भातलवंडे यांनी काम पाहिले.डान्स स्पर्धेतील अनुक्रमे विजेते पुढीलप्रमाणे-लहान गट प्रथम रोहित वाघमारे, द्वितीय स्वरा आगरकर,तृतीय शर्वरी काशीद मध्यम गट-सिध्दी चव्हाण,खुशी आगरकर आयुश मिश्रा मोठा गट-मुग्धा काशीद,अंजली कशब,तृतीय ग्रुपडान्स सिद्दीकी चौधरी,फातीमा शेख,सिध्दीक शेख,ताजेरा पठाण आदि. लिंबू चमचा स्पर्धा-आनु माने,शर्वरी काशीद,नैतीक मिश्रा,ऋतुराज पवार संगीत खुर्ची-नैतीक मिश्रा,सुहानी शुक्ला,खुशी आगरकर पोत्यातील उडी मारणे-ओम जाधव,प्रथमेश आगरकर आदिंनी पारितोषीक पटकावले.

या स्पर्धेसाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष आकाश काशीद आदित्य नांगरे,सनी काशीद,आण्णा लोकरे,कुणाल जाधव, वैभव मस्के,विनायक काटवटे,ओंकार काशीद,करण काशीद सुहास आगरकर,बाळराजे आगरकर,अतुल काशीद,शंतनु खर्डेकर,बी काशीद,योगेश मस्के,राहुल आगरकर, मंडळाचे मार्गदर्शक प्रकाश काशीद, पंकज नांगरे,विशाल काशीद आदीनी पुढाकार घेतला.

डोंजा येथील बाळोबा गणेश मंडळाच्या वतीने रांगोळी स्पर्धांचे आयोजन
परंडा तालुक्यातील डोंजा येथील बाळोबा गणेश मंडळाच्या वतीने रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.बाळोबा तरुण गणेश मंडळ डोणजे यांच्या वतीने डोणजे विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये दोन गटात रांगोळी स्पर्धा आयोजन केले होते. यामध्ये गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते, गावातील प्रतिष्ठित नागरिक राहुल पाटील, गोपाळ गुंजाळ इतर सर्व मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून कला विभाग प्रमुक पंडित पुराणे,सूत्र संचालन सांस्कृतीक विभाप्रमुख बापूसाहेब मुंडे यांनी तर आभार प्रमेश्वर जायभाय यांनी मानले

बातम्या आणखी आहेत...