आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या रहात्या वाड्याच्या जिर्णोद्धाराचा वर्धापनदिन कुंभार समाजाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुंभार समाजाचे एकत्रीकरण करून महासंघाचे पुनर्गठन करण्यावर विचारमंथन करण्यात आले.
१० जून २०१४ रोजी गोरोबाकाकांच्या राहत्या वाड्याचा जिर्णोद्धार करण्यात आला. तेव्हापासून या दिवशी कुंभार समाजातील नागरिक दरवर्षी तेर येथे येऊन हा दिवस वर्धापनदिन म्हणून साजरा करण्यात येतो. १० जून रोजी कुंभार समाजाच्या वतीने वर्धापनदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी वामनराव शिंदे होते. सर्वप्रथम संत गोरोबाकाका समाधी मंदिरात अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर दिपक महाराज खरात व गुलाब महाराज कुंभार यांचे प्रवचन झाले. यावेळी महाराष्ट्रातील कुंभार समाजाच्या तिन्ही संघटना कुंभार समाजाची शिखर संस्था असलेल्या कुंभार महासंघाच्या एका झेंड्याखाली एकत्रितपणे काम करतील, असा ठराव संमत करण्यात आला.
या विचार मंथन बैठकीत कुंभार समाज समन्वय समितीचे अध्यक्ष अशोकराव सोनवणे, महादेव खटावकर, विनायक राऊत, दत्ता कुंभार, सतीश दरेकर, मोहनराव जगदाळे, राजेंद्र बोरोडे, वामन महाराज शिंदे, विश्वनाथ कोळमकर यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमास नागनाथ कुभांर, पांडुरंग कुंभार, उस्मानाबाद रामशेठ राजे वसंत घोडनदीकर, अनंत कुभांर, पत्रकार महादेव कुंभार, पांडुरंग तात्या कुंभार कळंब, सुनंदा बेल्लाळे, नारीशक्ती राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त नारी कमल कुंभार, अपर्णा शिंदे, सुधीर चांदेकर, माधुरी दरेकर, सुरेश हिरे, भीमाशंकर म्हेत्रे, दिलीप खांडेकर, विजय देवडे, सतीश पाषाणकर, संजय राजे, विजय चव्हाण, उत्तम मांजरमकर. अॅड. सोपानराव बुडबाडकर यांच्या सह महाराष्ट्रातील कुंभार समाजबांधव उपस्थित होते. संत गोरोबाकाका वाडा ते समाधी मंदिर अशी टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव खटावकर यांनी तर आभार नागनाथअण्णा कुंभार यांनी मानले .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.