आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप:मंगळवारचा दिवस प्रक्रियेत,बुधवारी प्रत्यक्षात खात्यात येऊ शकते विमा रक्कम

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप २०२० मधील पीकविम्याची रक्कम मंगळवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, हा दिवस पूर्ण प्रक्रिया करण्यातच गेला आहे. यामुळे बुधवारपासून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष रक्कम मिळण्यास प्रारंभ होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

अनेक स्थित्यंतरे पार पडल्यानंतर २०२० खरिपाच्या पीकविम्याचे २०० कोटी व वरील सुमारे दिड कोटीचे व्याज प्रशासनाच्या नवीन लेखाशीर्ष खात्या सर्वोच्च न्यायालयाकडून जमा करण्यात आले आहे. आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांना खात्यावर रक्कम वर्ग करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात येत आहे. सोमवारी जिल्ह्यातील सर्व कृषी तालुका अधिकाऱ्यांकडे रक्कम वर्ग करण्यात आली आहे. मंगळवारीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे सांगण्यात येत होते. परंतु, मंगळवारचा संपूर्ण दिवस प्रक्रिया करण्यासाठीच खर्च करावा लागला. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आलेली रक्कम संबंधित बँकांकडे वर्ग करण्यात आली.

यासाठी याद्या अंतिम करणे, रक्कम जमा करणे आदी कामांसाठी मोठा वेळ गेला. यामुळे मंगळवारी कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होऊ शकली नाही. आता ही रक्कम बुधवारी जमा होण्याची शक्यता आहे. प्रकिया करण्यासाठी अधिक वेळ गेल्यामुळेच मंगळवारी खात्यात रक्कम वर्ग झालेली नाही. परंतु, बुधवारी ही प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे जिल्हा अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी महेश तिर्थकर यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात ६६३९ रुपये
रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. सर्व मिळून २०२०च्या खरीप विम्याची ५३० कोटी मिळून शेतकऱ्यांना हेक्टरी १८ हजार रुपये मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या २०१ कोटीच उपलब्ध असल्यामुळे पहिल्या टप्प्यात ६६३९ रुपये प्रती हेक्टरी वितरीत करण्यात येणार आहेत. तीन लाख ५७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात इतकी रक्कम वर्ग होईल.

बातम्या आणखी आहेत...