आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या १४ विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांपैकी ११ संस्था बिनविरोध झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील २२ संस्थांपैकी २० सेवा संस्थाही अविरोध झाल्याचे चित्र मंगळवारी (दि. १०) स्पष्ट झाले आहे. आलूर व चिंचोली भूयार गावात दोन पॅनलमध्ये निवडणूक होत आहे.
तालुक्यात एकूण ६२ सेवा संस्थेपैकी पहिल्या टप्प्यात १४ गावच्या विविध सहकारी संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली. दुसऱ्या टप्प्यात २२ गावाच्या विविध संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून स्थानिक पातळीवरील वाद टाळण्यासाठी पक्षाच्या नेतेमंडळींनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून छाननीपर्यंत सामंजस्याची भूमिका घेतली. शेवटच्या टप्प्यात निवडणुका अविरोध काढण्यासाठी प्रयत्न झाल्याने बहुतांश सेवा संस्था बिनविरोध निघाल्या. तालुक्यातील सर्वच संस्थात १३ जागा आहेत.
बिनविरोध निघालेल्या संस्था पुढीलप्रमाणे : मातोळा, औराद, कुन्हाळी, बेडगा, कोथळी, केसरजवळगा, सुंदरवाडी, कंटेकुर, उमरगा, बेटजवळगा, सुपतगाव, डिग्गी, तलमोड, बेळंब, काळ निंबाळा, तुरोरी, मुरूम, बलसुर, कोरेगाव, गुंजोटी या गावात सर्वच पक्ष, गटतट एकत्र येत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी गावपातळीवर चर्चेमुळे बिनविरोधचा मार्ग निघाला. यासाठी निवडणूक निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निंबधक पी. एल. शहापूरकर, सहायक सहकार अधिकारी डी. डी. चिवडे, मुख्य लिपिक एस. जी. माळी, सहकार अधिकारी एन. पी. हाडूळे, सहायक सहकार अधिकारी पी. सी. सुनापे, उपलेखा परीक्षक व्ही. एम. कातपुरे, विभूते यांनी नेमूणक दिलेल्या सेवा संस्थेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.