आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:महान केंद्रातील शिक्षकांचे प्रशिक्षण उत्साहात; निपुण भारत अभियान अंतर्गत शिक्षकांना उद्बोधन सत्रामध्ये मार्गदर्शन

बार्शीटाकळी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी रतनसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महान केंद्रात केंद्र शासनाचे निपुण भारत अभियान अंतर्गत वर्ग इयत्ता १ ते ५ ला शिकवणाऱ्याा शिक्षकांचे उद्बोधन सत्राचे आयोजन प्रा. जावेद खान विद्यालय येथे केले होते.

या प्रशिक्षणास अंगणवाडी सेविकांची उपस्थिती होती. कार्यक्रमात केंद्रप्रमुख विनोद पिंपळकर, उज्वला बनाईत, आर. ए. सोनार यांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा झाली. यावेळी संदीप पालवे, शिवशंकर असवर, तेजराव बिल्लेवर, जाहिदूर रहेमान, शाहिद इक्बाल खान यांनी शिक्षकांना अभियानाबाबत माहिती दिली. केंद्रस्तरावरून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत ३ ते ९ वयोगटातील बालकांच्या पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान यावर विशेष भर दिला आहे. त्यासाठी केंद्रशासनामार्फत ५ जुलै २०२१ रोजी निपुण भारत अभियान सुरू केले आहे. निपुण भारत अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित होण्यासाठी राज्यात उपक्रम कार्यक्रम राबवत आहेत.निपुण भारत अभियानाबाबत मुख्याध्यापक, शिक्षक, पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी यांच्यात जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. या अभियानांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने शिक्षकांना त्यांची भूमिका स्पष्ट होण्यासाठी समूह साधन केंद्रातील व्यवस्थापनाच्या , सर्व माध्यमाच्या प्राथमिक शिक्षकांसाठी इ.१ ते ५ च्या शिक्षकांसाठी व अंगणवाडी सेविकांसाठी ६ ऑगस्टला निपुण भारत अभियान केंद्रस्तरीय शिक्षक उद्बोधन सत्राचे आयोजन केंद्रस्तरावर केले होते.यावेळी शिक्षक, अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान भाषा व गणित कशाप्रकारे निर्माण करायची याची माहिती दिली. या वेळी शिक्षकांनी अभियानची शपथ घेतली. या वेळी मुख्याध्यापक प्रकाश राठोड, मुजीब बेग मोहम्मद बेग, मो इकराम खान, सज्जाद अहेमद, विजय टपके, अब्दुल खालीक, प्रकाश साबळे, मुख्याध्यापक मोहन तराडे, गजानन गोतरकर, मुख्याध्यापक दुर्गा होरे, खुतिजा बेगम, गुले राणा रिजवाण अहेमद, नामदेव देवकाते, नदीम खान आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शाहीद इकबाल खान यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...