आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:तुळजापुरात एकाचवेळी 16 चारचाकींच्या काचा फोडल्या; तिघांविरोधात गुन्हा

तुळजापूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात एकाचवेळी १६ चारचाकींच्या काचा फोडल्याची घटना रविवारी (दि.१२) रात्री उशिरा घडली. यासाठी लोखंडी कोयता, दगड व काठ्यांचा उपयोग करण्यात आला. शहरातील हाडको, नळदुर्ग रोड, कन्या शाळा, नगरपालिका आदी भागात चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. याप्रकरणी रोहन नागनाथ पांढरे (रा. जवाहर गल्ली) यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला.

आरोपी फरार आहेत. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी हाडको भागात गाड्या फोडल्याची घटना घडली होती. पुन्हा एकदा शहरातील गाड्या फोडल्याने दहशत निर्माण झाली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे-पाटील, पोलीस निरीक्षक आजिनाथ काशिद आदींनी भेट देऊन पाहणी केली. तपास सहायक पोलीस निरीक्षक चासकर करत आहेत.

पोलिस ठाण्यासमोर कारवर घातला दगड
रात्री दीडच्या सुमारास येथील पोलिस ठाण्यासमोर विपीन शिंदे यांच्या दारातील भाविकांच्या कारवर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी दगड घातल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...