आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिक हैराण:सतत होणाऱ्या पावसाने तुळजापूरमध्ये हद्दवाढ भागात चिखलाचे साम्राज्य; एक महिन्यापासून चालू असलेल्या सततच्या पावसाने लोक अडचणीत

तुळजापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सततच्या पावसाने शहरातील हद्दवाढ भागातील रस्त्या वर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना चिखलातून पायी चालणे ही मुश्किल झाले आहे. चिखलात दुचाकी तसेच चार चाकी वाहणे फसण्याचे प्रकार वाढल्याने हद्दवाढ भागात तातडीने रस्ता करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. गेल्या एक महिन्या पासून सातत्याने सुरू असलेल्या पावसाने हद्दवाढ भागातील नागरिकांना अडचणीत वाढ झाली आहे. या भागातील कच्चा रस्त्यावर वर चीखलाचे साम्राज्य पसरले आहे. प्रचंड चीखलातून रस्ता शोधताना अबाल वृध्दांची दमछाक होत आहे. तर चिखलात वाहने फसण्याचे प्रकार होत असल्याने नागरिक वैतागले असून हद्दवाढ भागात तातडीने रस्त्याची डागडूजी करण्याची मागणी होत आहे.

अनेक वर्षांचा प्रतिक्षे नंतर साल सन २०१४ साली शहराच्या हद्दवाढीला मंजुरी मिळाली. पालिका हद्दीतील समावेशा नंतर रस्ते, गटारी, पथ दिवे, पाणी पुरवठा आदी सुविधा मिळतील अशी अपेक्षा ठेवणाऱ्या हद्दवाढ भागातील नागरिकांचा पदरी तब्बल ०८ वर्षानंतर ही निराशा आली आहे. बेटर मेंट चार्जेस च्या रूपाने पालिकेचा तिजोरीत हजारो रूपयांची भर टाकल्या नंतर हद्द वाढ भागातील नागरिकांना मुलभुत सुविधा साठी वर्षानुवर्षे प्रतिक्षा करावी लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हद्दवाढ भागाची पालिकेकडून उपेक्षा
८ वर्षा पूर्वी शहरातील गवते प्लाॅटींग, अपसिंगा रोड, शिंदे प्लाॅटींग, शिवरत्न नगर, लातूर रोड, नळदुर्ग रोड आदी भाग नगर पालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आला. हद्दवाढ भागातील नागरिक विकासाचा प्रतिक्षेत आहेत. अंतर्गत रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, पथदिवे आदी मुलभूत सुविधा सह खुल्या जागा विकसित करण्याची नागरिकांची अपेक्षा आहे. लोकांचा अंत पाहू नये अशी अनेकांची अपेक्षा आहे.

वाहने अडकल्याने सर्वांचीच गैरसोय
सततच्या पावसाने चिखलातून नागरिकांना पायी चालणे मुश्किल झाले आहे. दुचाकी व मोठी वाहनेसुध्दा चिखलात फसत असल्याने अडचणीत भर पडली आहे. यामुळे हद्दवाढ भागातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अवजड वाहनांचे जेथे हाल होतात तेथे इतर छोटया वाहनांचे काय होत असेल याचा विचारच न केलेला बरा. कोणी आजारी पडले तर येथून जायचे कसे?

बालाजी नरवडे, हद्दवाढ भागातील नागरिक

बातम्या आणखी आहेत...