आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणूक:तुळजापूर तालुक्यात सरपंच पदाचे 4 तर सदस्यांचे एकूण 17 अर्ज बाद

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमेदवारी अर्जाच्या छाननीत एकूण २१ अर्ज बाद ठरले आहेत. यामध्ये सरपंच पदाचे ४ अर्ज तर सदस्यांचे १७ अर्ज बाद ठरले आहेत. दरम्यान बुधवार (दि. ७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून त्या नंतर च ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तालुक्यातील ४८ ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू असून सोमवार (दि. ५) उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. रात्री उशिरा पर्यंत चाललेल्या छाननी मध्ये एकूण २१ अर्ज बाद ठरवण्यात आले.

सरपंच पदाचे बोरनदवाडी नळ, सलगरा म., माळुंब्रा व चिकुंद्रा प्रत्येकी एक अर्ज बाद ठरले आहेत. तर सदस्य पदासाठी काक्र॔बा, सलगरा व काटी ग्रामपंचायतीचे प्रत्येकी ३ अर्ज बाद ठरले आहेत. दरम्यान उमेदवारी अर्जाची छाननी रात्री उशिरा पर्यंत चालली. यावेळी दोन्ही बाजूंनी वकिलांची फौज तैनात करण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढे काय होते याकडे लक्ष लागले आहे.

आज चित्र स्पष्ट होणार
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत बुधवार (दि. ७) दुपारी ३ वाजे पर्यंत असून त्या नंतरच ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच मोठ्या संख्येने युवकांनी पुढाकार घेतला असून जेष्ठांना जेरीस आणले आहे. इच्छुकांची मोठी संख्या पाहता यावेळी बिनविरोध शक्यता धुसर दिसत आहे.

ढोकीमधील लढत तिरंगी, चौरंगी की पंचरंगी याकडे लक्ष
उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी ग्रामपंचायतसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस असून किती उमेदवार रिंगणातून माघार घेतात यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची व सर्वात मोठी असलेल्या ढोकी ग्रामपंचायतचे सरपंच पद नागरिकाच्या मागास प्रवर्गातील महिलासाठी राखीव आहे. सरपंच पदासाठी १२ उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल केले आहे.

ग्रामपंचायत सदस्य पदाकरिता सहा प्रभागात मिळून १७ जागांसाठी १३७ उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल केले आहे. आज बुधवार दिनांक ७ रोजी नामांकन पत्र मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून निवडणुकीतून किती उमेदवार माघार घेतात यावर लढतीचे चित्र अवलंबून आहे. ढोकी ग्रामपंचातवर ताबा मिळविण्याकरिता सर्वच राजकीय पक्ष चुरशीने निवडणुकीत उतरले असून पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या सोयीनुसार युत्या- आघाड्या करत आहेत. काल रात्रभर उमेदवारी निश्चिती सोबतच युती व आघाडी साठी पॅनल प्रमुख खल करत होते. एकंदरीत निवडणुकीचे चित्र आज माघारी नंतर स्पष्ट होईल.

बातम्या आणखी आहेत...