आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गलथानपणा:तुळजापूर तालुक्यात जागेवरच बसून हजाराेंची वीजबिले पाठविण्याचा प्रकार

तामलवाडी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील महावितरण कंपनीचा घरगुती वीज ग्राहकांच्या वीजबिलाबाबत मनमानी कारभार सुरू असून, गेल्या २-३ महिन्यात जागेवर बसूनच ग्राहकांना अंदाजे बिले पाठविण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. याबाबत तुळजापूर येथील कार्यकारी अभियंता व कार्यालयातील काही कर्मचारी ग्राहकांना उध्दट भाषेत बोलत असल्याने महावितरणच्या जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घ्यावी. तसेच तालुक्यातील घरगुती वीज ग्राहकांची बिले येत्या ८ दिवसात दुरूस्त करून द्यावीत, अन्यथा वीज कंपनी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा उपाध्यक्ष तथा माजी सैनिक शिवाजी सावंत यांनी दिला आहे.

याबाबत विस्ताराने बोलताना ते म्हणाले की, तुळजापूर तालुक्यातील विविध गावच्या वीज ग्राहकांच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. तुळजापूर कार्यालयाकडून मीटर रिडिंगसाठी नेमण्यात आलेले खाजगी कर्मचारी वीज ग्राहकांच्या मीटरची अनेक महिने रिडिंगच घेत नाहीत. या कार्यालयाकडून अंदाजे वीजबिले पाठविण्यात येतात. काही वेळा तर एक ते दोन वर्षानंतर त्यांच्या मीटरची रिडिंग घेवून हजारोंनी बिले विनाकारण जास्तीची पाठवित आहेत. यामुळे प्रामाणिक बील भरणा करणाऱ्या ग्राहकांवर वीज बिलांचा अचानक आर्थिक ताण येत आहे. तालुक्यातील तामलवाडी येथे तर अनेक ग्राहकांच्या अशा तक्रारी वाढल्या आहेत.

तुळजापूर येथील वीज कंपनी कार्यालयातील संबंधित कर्मचारी याबाबत ग्राहकांचे म्हणणे अजिबात ऐकून घेत नाहीत. अगोदर बील भरा पुन्हा तुमचं बोला. वीज बील भरले नाहीतर तुमची वीज जोडणी तोडली जाईल, अशा शब्दात ग्राहकांना दम देण्याचा प्रकार करतात. जे ग्राहक रेग्युलर वीजबिले भरतात, त्यांनाही एक-दोन वर्षानंतर असा दणका देण्याचा सपाटा या कार्यालयाने सुरू केला आहे. अचानक २० हजार, ३० हजार, ४० हजार घरगुती बिले निघू लागल्याने रोष निर्माण होत चालला आहे. यामुळे जिल्हा अधीक्षक अभियंत्यांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि ग्राहकांची वीज बिले नियमानुसार घ्यावीत, असे ते म्हणाले.

तब्बल २३ महिन्यानंतर घेतले रिडिंग ! एक-दोन महिने नव्हेतर तब्बल २३ महिन्यांनी माझ्या घराबाहेर बसविलेल्या घरगुती मीटरची वीज रिडिंग घेतली गेली. तोपर्यंत अंदाजे बील भरणाही माझ्याकडून दरमहा करून घेतला. मात्र आता या नवीन रिडिंगप्रमाणे त्यांनी फरक काढून एकदम २५ हजाराचे बील पाठविले. अचानक आलेले मोठे बील पाहून मीही गोंधळलो. याबाबत तुळजापूर कार्यालयाचे कार्यकारी अभियंता, वीज बिल काढणारे कर्मचारी माने यांच्याशी भेटून संवाद साधलातर ते म्हणाले, आमच्याकडे २३ महिन्यात रिडिंगच न आल्याने असा अनेक ग्राहकांचा घोळ रिडिंग घेणाऱ्या एजंटांनी घातला आहे. यामुळे आता हे बील भरा अन्यथा वीज जोडणी तोडण्यात येईल. एकप्रकारे दम देण्याचीच भाषा त्यांच्या तोडून ऐकली. ग्राहकांचे भरदिवसा खिसे कापण्याचेच काम या कार्यालयाकडून चालू असल्याने याची रितसर तक्रार वरिष्ठांकडे करणार आहे. अविनाश गायकवाड, तामलवाडी

बातम्या आणखी आहेत...