आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतींवर दावा:तुळजापूरमध्ये सत्ताधाऱ्यांना बसवले घरी, युवक प्रभावी

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने बदल घडवत सत्ताधाऱ्यांना घरी बसवले. यावेळी बहुतेक ग्रामपंचायतीत युवकांनी सत्ता काबीज केली. दरम्यान, तालुक्यातील ४८ पैकी ३५ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदांवर भाजपने दावा सांगितला आहे. दुसरीकडे काँग्रेसने १७ आणि महाविकास आघाडीने ९ सरपंचपदावर दावा केला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि. २०) सकाळी पार पडली. यावेळी बहुतांश ग्रामपंचायतीत नागरिकांनी बदल घडवला आहे. तीन तासात मतमोजणी करण्यात आली. मतमोजणी केंद्रावर उमेदवारांसह समर्थकांनी गर्दी केली होती. विजयानंतर समर्थकांनी वाजतगाजत फटाके फोडून जल्लोष केला. आपसिंगा, काक्रंबा, हंगरगा तुळ येथे बदल तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा, कांक्रबा, हंगरगा तुळ, काटी, कार्ला, मोर्डा-तडवळा आदी ग्रामपंचायतीत नागरिकांनी बदल घडवत सत्ताधाऱ्यांना घरी बसवले. यावेळी बहुतांश ग्रामपंचायतीत युवकांनी वर्चस्व मिळवले आहे. आता नव्या कारभाऱ्यांच्या कामावर सर्वांचे लक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...