आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसर्गाचे संकट:दोन तालुक्यात सात जनावरांना लंपी आजाराची लागण; भूममध्ये भिती

उस्मानाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सर्वत्र जनावरांच्या लंपी आजाराने थैमान घातले आहे. गेल्या आठवड्या पर्यंत जिल्ह्यात एक ही बाधित आढळून आला नव्हता. मात्र आता लोहारा आणि उमरगा या दोन तालुक्यात सात जनावरांना याची लागण झाल्याचे समोर आले. जेथे लागण झाली त्या पाच किमी परिसरात लसीकरण सुरुवात करण्यात आले आहे. लंपी या विषाणूजन्य सांसर्गिक चर्म रोगाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे राज्य शासनाने काळजी घेण्यासाठी उपाय योजना व जिल्हा नियंत्रित प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याच्या सूचना केल्या आहे.

या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून जिल्ह्यात बाधित जनावरे नसल्याने चिंता नव्हती. मात्र, आता बाधित जनावरे आढळून येत असल्याने पशु पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग जागरूक झाला असून त्यांनी लसीकरणास प्रारंभ केला आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने जनावरांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. गोठा साफसफाई करण्यासह जनावरांवर औषध फवारणी केल्यास या आजारापासून दिलासा मिळतो. पण संसर्ग रोखण्यासाठी थेट लसीकरणच एक मार्ग आहे.

स्थलांतरास बंदी
आता पर्यंत जिल्ह्यात या आजाराचे जनावर आढळेल नव्हते. आता काही प्रमाणात बाधित जनावर आढळत आहे. यात अद्याप एकही जनावराचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. मात्र, शेतकऱ्यांनी गोवंशीय आणि म्हैस वंशीय जनावरांची काळजी घ्यावी. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

राज्यात जनावरांना लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून अनेक जनावर यात दगावली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आठ सप्टेंबर रोजी अधिसूचना काढून प्राण्यांमधील संक्रमक, सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण कायद्यांतर्गत लंपी नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे जनावरांच्या बाजारासह जनावरांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, जिल्ह्यात नेण्यास मनाई करण्यात आली आहे.याबाबत बोलताना जिल्हा पशुधन अधिकारी वाय. बी. पुजारी म्हणाले की, ज्या दोन तालुक्यातील गावात लंपीची बाधा झालेले जनावरं सापडले त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. त्या परिघात लसीकरण सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...