आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वपक्षीय विजय:उमरगा तालुक्यात 23 पैकी 17 ग्रामपंचायतींची सत्ता महिलांच्या हाती

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रियेत तालुक्यातील ग्रामपंचायतीची मंगळवारी (दि. २०) सकाळी शहरातील अंतुबळी सांस्कृतिक सभागृहात १३ टेबलवरून आठ फेऱ्यातून ८० कर्मचाऱ्यांनी मतमोजणीला सुरुवात केली. २३ ग्रामपंचायतीत सर्वाधिक बाळासाहेब ठाकरे सेना त्यापाठोपाठ भाजपला यश मिळविले, कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसलाहि यश मिळाले असले तरी बहुतांश ग्रामपंचायत सर्वपक्षीय विजय झाल्याचे सांगितले जात होते.

तालुक्यातील २३ ग्रामपंचायत थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रियाला सुरुवात झाल्यामुळे ग्रामपंचायतीसाठी रविवारी शांततेत ७२.८१ टक्के मतदान झाले होते. मंगळवारी (२०) सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या निकालात त्रिकोळी ग्रामपंचायातीत भाजप. कोराळ ग्रामपंचायतीवरती दुसऱ्यांदा राष्ट्रवादीने झेंडा फडकावला. धाकटीवाडी येथेही भाजपाला यश मिळाले.ग्रामपंचायत निकालात बाळासाहेब ठाकरे सेना अन भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी चार तर महालिंगरायवाडी, माडज, औराद गावात सर्वपक्षीय सरपंच विजयी झाले.

आनंदनगर ग्रामपंचायतीत भाजप पुरस्कृत अनिता जाधव यांनी अवघ्या चार मतांनी विजय मिळविले. कंटेकुर ग्रामपंचायतीत कॉंग्रेसला छेद देत बाळासाहेब ठाकरे सेनेच्या विजया जमादार सहा मताने विजयी झाले. केसरजवळगाचे माजी सरपंच बलभीम पटवारी यांच्या पत्नी पुजा पटवारी विजयी झाल्या आहेत. तालुक्यात २३ पैकी १७ ग्रामपंचायतीवर महिलांना संधी मिळाली आहे.

ग्रामपंचायती आमच्याच असल्याचा सर्वच पक्षांचा दावा
भुसणी/भुसणीवाडी पौर्णिमा गायकवाड, कंटेकुर विजया जमादार, बेळंब सत्यभामा बाबशेट्टी, चिंचोली (ज) विद्या ब्याळे, त्रिकोळी मुद्रिकाबाई सुरवसे,कोथळी लक्ष्मी सुरवसे, चिंचोली भुयार/काटेवाडी उषाताई बिराजदार, येणेगूर येथे देविनंदा बनसोडे, कोराळ मंजुषा सगर, केसरजवळगा पुजा पटवारी, आलूर लिलावती जेऊरे, माडज सारिका पाटील, मळगी योगिता बिराजदार, वरनाळवाडी शाणम्मा तोळनुरे, सुंदरवाडी कृष्णाबाई सुरवसे, महालिंगरायवाडी विजयाबाई माने, आनंद नगर अनिता जाधव या १७ गावात महिलाराज असून मळगीवाडी सतीश सोमवंशी, नारंगवाडी शेखर घंटे, औराद सुशिल जाधव, एकुरगा/एकुरगावाडी पदमाकर कुनाळे, कलदेव निंबाळा महादेव कांबळे, धाकटीवाडी येथे श्रीकांत चंडकापुरे. यांनी विजय मिळविले आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूका या स्थानिकपातळी वरती होत असल्याने राजकीय हस्तक्षेप होत असलातरी ही निवडणूक राजकीय झाल्याचे दिसून येत आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष सर्वाधिक सरपंच व ग्रामपंचायत आमच्या असल्याचा दावा करीत आहेत. परंतु विजयी उमेदवार सर्व पक्षाच्या कार्यालयात जावून सत्कार स्वीकारत असल्याचे दिसून येत होते.

जिप सदस्य झाले नारंगवाडीचे सरपंच
जिल्हा परिषद गत पंचवार्षिक निवडणूकीत कवठा गटातून शिवसेनेकडून निवडणूक लढवून विजयी झालेले शेखर घंटे यांनी पाच वर्ष जिप सदस्य होते. नारंगवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत विजय मिळवून आता थेट सरपंच झाले आहेत श्री घंटे यांना कोणत्या पक्षाचे सरपंच असे विचारले असता त्यांनी हा विजय सर्वपक्षीय असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...