आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकटात:उमरगा तालुक्यात थंडी व धुक्यामुळे आरोग्यासह रब्बी हंगामातील पिके संकटात

उमरगा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात गेल्या पाचसहा दिवसांपासून अधूनमधून थंडीत वाढ होत चाललेली असून अशा बोचऱ्या थंडीपासून बचाव करण्यास नागरिकांना शेकोटी व उबदार कपडे वापरत आहेत. दिवसभर उन्हं, रात्री कडाक्याची थंडी अशा हवामान बदलाने पहाटे धुक्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा, करडई पिक संकटात आले तर लहान व ज्येष्ठांच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे.

तालुक्यात यंदाच्या वर्षात झालेल्या अतिवृष्टी अन मुबलक पावसामुळे सर्वत्र पाण्याच्या साठ्यात वाढ झालेली असून सुगीच्या दिवसात सुटलेल्या थंड वाऱ्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. अधूनमधून पडणाऱ्या धुक्यामुळे हरभरा पिक संकटात आले असून शेतकऱ्यांना पदरमोड करून महागडे कीटकनाशके खरेदी करून फवारणी करावी लागत आहे. गेल्या चार दिवसापासून थंडीत मोठी वाढ झाल्याने अंगाला झोंबत असलेल्या बोचऱ्या थंडीने त्रस्त झाले असून लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत थंडीपासून बचाव करण्यासाठी पारंपरिक घोंगडे, कुंची, दुपाटे, कानटोपी, शाल, स्वेटर, जर्किन, स्कार्फ या उबदार कपड्यांच्या वापरात वाढ झाली तर बाजारात गरम कपडे खरेदीसाठी गर्दी होत आहे.

शहरातील व ग्रामीण भागात गावागावातून मुले, वृध्द नागरिक पहाटे व संध्याकाळी शेकोट्या पेटवितात. सध्या पारा १५ अंशावर आहे.रात्री दहापर्यंत गजबजलेले रस्ते आता ओस पडलेले दिसतात. हवामानातील होत असलेल्या बदलाने आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असून याचा फटका लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना बसतो आहे. कोरोना विषाणूची भीती असताना सर्दी, खोकला, ताप, घसा व डोके दुखणे आदी आजाराची संख्या वाढली असल्याने चिंता आहे.

बातम्या आणखी आहेत...