आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उमरगा तहसील कार्यालयात अभिलेख कक्षातील‎ दस्तावेज होणार अद्ययावत, स्कॅनिंगचे काम सुरू‎

उमरगा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तहसील कार्यालयातील अभिलेख‎ कक्षातील दस्तावेजांचे अद्ययावतीकरण‎ करण्यात येणार आहे. यासाठी दस्तावेजांचे‎ स्कॅनिंग सुरू झाले आहे. पावसाळ्यात‎ तळमजल्यातील अभिलेख कक्षात पाणी‎ भरल्याने दस्तावेजांच्या सुरक्षिततेसाठी‎ कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागली होती.‎ परंतु आता स्कॅनिंग मोहीम हाती घेतल्याने‎ १९५४ पासूनच्या शेतीविषयक व अन्य‎ कागदपत्रांची सुरक्षितता जपण्यास मदत होणार‎ आहे.

‎ उमरगा तहसील व भूमी अभिलेख‎ उपाधीक्षक कार्यालयातील जुन्या अभिलेखांचे‎ स्कॅनिंग करण्याची सूचना निवासी‎ उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी‎ केली होती, हा निर्णय आता जिल्ह्यातील सर्व‎ तहसील कार्यालयांना लागू होणार आहे.‎ उमरगा तहसील कार्यालयात मागील‎ आठवड्यापासून स्कॅनिंगचे काम सुरू झाले‎ आहे.

तहसीलच्या अभिलेख कक्षात‎ तालुक्यातील शेतीविषयक जुन्या माहितीची‎ कागदपत्रे आहेत. परंतु पूर्वीपासून सुरक्षिततेची‎ काळजी प्रशासनाने घेतली नसल्याने‎ कागदपत्र जीर्ण झाली असून बहुतांश‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दस्तावेजांचे तुकडे पडले आहेत. चार वर्षांपूर्वी‎ तत्कालीन तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कार्यकाळात अभिलेखांचे कामकाज हाती‎ घेतले होते. परंतु ते परिपूर्ण झाले नव्हते.‎

आठ-अ, एनए, सातबारा आदी कागदपत्रांचा समावेश‎
आता नव्याने स्कॅनिंग सुरू झाले आहे. यात‎ १९५४ पासूनचे खासरा पाहणी, पाहणी पत्रक,‎ फेरफार, आठ-अ, लेआउट नकाशे, एनए‎ आदी कागदपत्रांचा समावेश आहे. तसेच‎ १९५८ पासून २०१५ पर्यंतचे सातबारा उताऱ्यांचे‎ स्कॅनिंग होणार आहे. २०१६ पासूनचे सातबारा‎ उतारे ऑनलाइन झाले आहेत.

या स्कॅनिंग‎ कामकाजामुळे जुन्या माहितीचा डाटा सुरक्षित‎ ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न राज्य सरकार व‎ प्रशासनाकडून केला जात आहे. अभिलेख‎ स्कॅनिंगचे टेंडर गुजरात येथील तीर्थ इन्फो‎ टेककडे देण्यात आले आहे. या संस्थेला‎ तहसील कार्यालय स्तरावर सहकार्य करून‎ कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना‎ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार‎ अद्ययावतीकरणास सुरुवात झाली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...