आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:व्हंताळमध्ये विद्युत रोहित्र एक महिन्यापासून नादुरुस्त; गावासह शिवारातील शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील व्हंताळ गावातील विद्युत रोहित्र नादुरुस्त होवून महिना झाला तरीही अद्याप शिवारात विद्युत पुरवठा कार्यान्वित करण्यात आला नसल्याने पाण्या अभावी पिके, जनावरांचे हाल होत असून शेतकरी संकटात सापडले असताना संबंधित विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील अनेक गावात वीज वितरण कंपनीचे वाकलेले पोल व लोंबकाळणाऱ्या विद्युत तारांच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे दिवसेंदिवस धोकादायक बनत चालल्या आहेत.

त्यात वारा व जोरदार पाऊस झाल्याने वीज पुरवठा खंडीत होत आहे. व्हंताळ शिवारातील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाले असल्याने एक महिन्यापासून येथील शेतकरी, नागरिकांनी वेळोवेळी सांगूनहि वीज वितरण कंपनीकडून दुरुस्तीसाठी दुर्लक्ष होत आहे. वीज वितरणकडून दुरुस्तीसाठी प्रयत्न होत नसल्याने शिवारातील विद्युत पुरवठा बंद असल्याने भर पावसाळ्यात पाण्याअभावी शिवारातील पिके, भाजीपाला व फळबागाचे नुकसान होत आहे. शेतकरी,नागरिक व जनावरांचे पाण्याचे अभावी हाल होत आहेत. दरम्यान महावितरण विभागाकडे वारंवार माहिती देत पाठपुरावा करून अद्याप विद्युत रोहित्र दुरुस्ती अथवा नव्याने बसविण्यात आलेले नाही. संबंधित विद्युत विभागाचे कर्मचारी यांना मोबाईलवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळत नाही.

जवळपास महिना होत आला तरीही वीज पुरवठा खंडीत असल्याने पिकांसोबत पशुधन अडचणीत आले आहेत.उभ्या पिकांचे होणाऱ्या नुकसानीस कोण जबाबदार,शेतकऱ्यांसमोर आत्महत्येचा पर्याय शिल्लक राहिला असल्याची शेतकऱ्यानी व्यथा व्यक्त केली.गेल्या अनेक वर्षापासून असलेल्या विद्युत वाहिन्या आता खराब झाल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होतोय. जीर्ण झालेल्या तारा व रस्त्यामध्ये आलेले पोलची दुरुस्ती करण्यासाठी वेळोवेळी मागणी होत असताना दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.

अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे
याबाबत व्हंताळ येथील शेतकरी अजित जाधव म्हणाले की, गावाशेजारील डीपी गेल्या एक महिन्यापासून बंद अवस्थेत असल्याने गावात मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुरुस्तीच्या नावाखाली नादुरुस्त अवस्थेत डीपी असल्याने शेतीस पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. मागील पंधरा दिवसापासून पाऊस उघडल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. रोहित्र नादुरुस्त असल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतीचे मोठे प्रमाणात नुकसान होत आहे. विद्युत मंडळाचे अधिकारी याकडे लक्ष केंद्रित करून त्वरित रोहित्र (डीपी) दुरुस्ती करून बसवावे.

बातम्या आणखी आहेत...