आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोमवारी (दि.७) च्या मध्यरात्रीपासून इतरत्र पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अल्प प्रमाणात हजेरी लावली. परंतु प्रचंड स्वरूपात सुटलेला वाऱ्यामुळे रब्बी पिकासह अंबा व इतर फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरिपात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने तालुक्यात रब्बीची पेरणी उशिरा झाली होती. साहजिकच काढणी देखील उशिरा होणार असल्याने आता कुठे तरी गहू, हरभरा याच्या काढणीला कुठेतरी सुरुवात झाली आहे.
चांगल्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे अंब्यासारख्या विक्रमी उत्पादन असणाऱ्या झाडांना कैऱ्या लकडून गेलेल्या पहावयास मिळत होत्या. मात्र सोमवारी मध्यरात्रीनंतर हवामानात बदल होऊन प्रचंड प्रमाणात वारे सुटल्याने काढणी केलेला हरभरा, शेतात उभा असलेला गहू जमिनीवर लोळला आहे.
तर लगडून गेलेल्या आंब्याच्या कैऱ्यांची रास जमिनीवर पडल्या आहेत. राज्यातील बऱ्याच भागात हजेरी लावणाऱ्या अवकाळी पावसाने तालुक्यात अल्प प्रमाणात हजेरी लावली पण सोमवारच्या मध्यरात्रीपासून दिवसभर देखील जोराचा वारा वाहत होता. दर उन्हाळयात अवकाळी पाऊस, हिवाळयाच्या अंतिम टप्प्यातील थंडीमुळे पिके खराब होतात. गारपीटीमुळे तर शेतकरी पुश्रता धास्तावलेला आहे. यामुळे आंबा,द्राक्षे यांचे अतोनात नुकसान होते. कांद्याने दणका दिल्याने अगोदरच शेतकरी नुकसानीतत गेलेला आहे . व्यापारी जो भाव देतात, त्याची अत्यल्प आकडेवारी अपमानास्पद आहे. उत्पादानसाठी झालेला खर्चही यात निघत नाही. पाणी असले तरी त्याचा पुरवठा करण्यासाठी वीजपुरवठा अखंडित असणे गरजेचे आहे. तसेच त्याला यार्डात भाव मिळणेही महत्वाचे आहे.
कंपनीचे विचित्र प्रश्न
रब्बीच्या पिकाचा विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परंतु नुकसानीची तक्रार करण्यासाठी पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधी कडे चौकशी केली असता नुकसान होणारा वारा होता का या बाबत नोंद ही प्रशासनाकडे झालेली नाही त्यामुळे तक्रार करूनही फायदा होणार नाही असे सांगण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होऊन फक्त शेतकऱ्याचे नुकसान न झाल्याची खात्री होणारी यंत्रणा शासन प्रशासन आणि विमा कंपनीकडे कशी असते असा सवाल विचारला जात आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाण नाही. यावरून कळते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.