आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:वाशी तालुक्यात चारपैकी 3 ग्रामपंचायती ताब्यात घेऊन शिंदे सेनेची झाली सरशी

वाशी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात रविवारी पार पडलेल्या चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिकनिवडणुकीतील मतदानाची मंगळवारी (दि.२०) मतमोजणी होऊन निकाल हाती पडले. तालुक्यातील मसोबाचीवाडी, गोजवडा, वडजी व पिंपळवाडी या चार ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सरपंच निवडही थेट जनतेतून असल्याने मोठी चुरस निर्माण झालेली होती. त्याच बरोबर राज्यातील सत्तांतरानंतर ग्रामीण भागावर वर्चस्व असलेल्या शिवसेनेतील फुटीनंतर स्थानिक नेत्यांच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण होऊन सरशी शिंदे गट की ठाकरे गट कोणाची होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

यामध्ये १ सरपंच व ७ सदस्य संख्या असलेल्या पिंपळवाडी ग्रामपंचायतमध्ये शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे प्रशांत चेडे व भाजपचे सुरेश कवडे यांच्या समर्थकांमध्ये थेट लढत होऊन शिंदे सेनेच्या पॅनल ने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत सरपंचपदाचे उमेदवार सुनील माणिक उंदरे यांच्यासह सातही सदस्य मोठ्या फरकाने विजयी झाले व मागील वेळी देखील जनतेतून सरपंच निवडून येत सरपंचपद व सत्ता कायम ठेवण्यात यश आले. गोजवाडा ग्रामपंचायतीमध्ये ९ सदस्य व १ सरपंच मध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने सत्ता कायम ठेवत विरोधी गटाला दोन सदस्यांवरच समाधान मानण्यास भाग पडले. सरपंचपदासाठी स्वाती अप्पासाहेब पाटील या महिला उमेदवार दोनशेहून अधिक मतांनी विजयी झाल्या.

तर ९ सदस्य संख्या व एक सरपंच अशा १० जागा असलेल्या वडजी ग्रामपंचायतमध्ये मागील पाच पंचवार्षिक एकाच गटाकडे सत्ता राहून विरोधी गटाला विजयी गुलाल न लागून देणाऱ्या सुनील जाधवर यांनी यावेळी विरोधी गटालाच सोबत घेऊन ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न केलं होते. यामध्ये केवळ एकच जागा बिनविरोध झाली आणि कायम विरोधक एकत्र आल्याने तरुणांनी त्यांना आव्हान उभा करत सर्वच जगावर उमेदवार दिले होते.

यामध्ये तरुणांना पहिल्याच प्रयत्नात यश येत सत्ता जरी खेचता आली नाही तरी दोन जगावर विशाल निवृत्ती जाधवर व पद्मीण शाहू डांगे हे दोन उमेदवार विजयी झाले. राहिलेली जागेवर सरपंच पदासाठी स्वतः सुनील जाधवर हे तर ७ जागेवर त्यांच्या आघाडीचे उमेदवार विजयी होऊन सत्ता कायम ठेवण्यात यश आले.

मसोबाचीवाडी मध्ये ७ सदस्यांपैकी चार सदस्य आधीच बिनविरोध निवडून आल्याने तीन जागांसाठी व एक सरपंचपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. ज्यामध्ये प्रतिभा युवराज कात्रे या महिला उमेदवार सरपंचपदासाठी निवडून आल्या.

बातम्या आणखी आहेत...