आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:लोहाऱ्यात महिला बचत गटाच्या कॉप-शॉपचे उद्घाटन

लोहारा2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचायत समितीमधील घरकूल डेमो हाऊसमध्ये महिला बचत गटाच्या कॉप-शॉपचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे व लोहारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन झाले.

उमेद अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती लोहारा द्वारा आयोजित उपजीविका वर्ष २०२२-२३ महाजीविका अभियान परिवर्तन महिला प्रभागसंघ कानेगाव अंतर्गत सद्गुरू महिला स्वयंसहाय्यता समुह लोहारा (खु) संचालित कॉप-शॉप सुरू करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे म्हणाल्या की, महिलांनी वेळोवेळी अभियानातून उपलब्ध संधीचा सदुपयोग करून घ्यावा. महिलांनी आपली उत्पादने बाजारपेठेत विक्री होण्याच्या दृष्टीने पॅकेजिंग, लेबलिंग व मार्केटिंगवर भर द्यावा.

या कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, सांखिकी विस्तार अधिकारी व्ही. व्ही. शहापूरकर, विस्तार अधिकारी एस. पी. भालेराव, जिल्हा व्यवस्थापक (मार्केटिंग) समाधान जोगदंड, सांख्यिकी विस्तार अधिकारी विनोद पवार, तालुका अभियान व्यवस्थापक अलंकार बनसोडे, तालुका व्यवस्थापक प्रणिता कटकदौंड, कौशल्य विकास तालुका समन्वयक माधुरी माळी, प्रभाग समन्वयक सौरभ जगताप, प्रदीप चव्हाण, प्रशासन सहायक रामेश्वर धुरगुडे, प्रभाग कृषी व्यवस्थापक किशोर हुडेकर, प्रभाग पशु व्यवस्थापक नंदन थोरात, कानेगाव प्रभागातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती, कविता मुर्टे आदींसह महिला उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...