आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीकविमा:वाशीमध्ये पीकविमा कंपनीच्या मोबाइल व्हॅनचे उद्घाटन

वाशी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबाबत जनजागृतीसाठी शुक्रवारी (दि.२९) तालुका कृषी कार्यालयात पीकविमा मोबाइल व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. भूमचे उपविभागीय कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. भारतीय कृषी विभाग कंपनीच्या वतीने ही व्हॅन उपलब्ध करण्यात आली आहे. ही व्हॅन तालुक्यातील सर्व गावांमध्ये भ्रमण करणार आहे. व्हॅनवर शेतकऱ्यांसाठी पीकविमा भरणे किती गरजेचे आहे, त्याचा कशा प्रकारे लाभ घेऊन नुकसान भरपाई मिळविता येईल, याची माहिती देणारे पोस्टर लावण्यात आले आहे.

चित्ररथाच्या माध्यमातून जास्तीत-जास्त शेतकऱ्यांमध्ये पीकविमा भरण्याबाबत जागृती करण्यात आली. यावेळी वाशी तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले व कळंब तालुका कृषी अधिकारी बी. बी. जाधव, सांख्यिकी अधिकारी बंडू कोकाटे, कृषी अधिकारी गणपतराव कदम, कृषी मंडल अधिकारी एस. व्ही. चव्हाण, श्याम खंडागळे, कृषी पर्यवेक्षक नितीन विश्वेकर, नानासाहेब साखरे, संभाजी जाधव, जयराम गोले, बालाजी आटोळे, सचिन पवार, कृषी सहायक सुषमा यादव, सलमा तांबोळी, बाळासाहेब डोईफोडे, उमेश अडसूळ, बी. सी. भुरे, नितीन चौधरी, अतुल पाटील, नाईकवाडी, भिसे, भाऊसाहेब खडे यांच्यासह भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका समन्वयक रामेश्वर सुरवसे, अच्युतराव ढेंगले व शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...