आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाशी:वाशी येथे डाळ मिल व दूध डेअरीचे उद्घाटन

वाशीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी वाशी शिवसेनेचे नेते प्रशांत चेडे यांच्या हस्ते तागडे शेतकरी उत्पादक कंपनी च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या डाळ मिल व लक्ष्मी दूध डेअरी चे उदघाटन करण्यात आले.

शेतकऱ्याच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा,आलेल्या उत्पादनावर स्थानिक पातळीवरच प्रक्रिया होऊन अधिकचा फायदा व्हावा या दृष्टीने सरकारकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. याच माध्यमातून वाशी येथे शेतकऱ्यांनी मिळून स्थापन केलेली तागडे शेतकरी उत्पादक कंपनीकडून कृषि विभागामार्फत अनुदानवरील डाळ मिल व दूध डेअरी ची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे उदघाटन शिवसेनेचे प्रशांत चेडे व बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वाशी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मछिंद्र कवडे,शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष नितीन चेडे,नागनाथ नाईकवाडी,माजी उपनगराध्यक्ष प्रसाद जोशी,माजी तालुका प्रमुख विकास मोळवणे,वाशी नगरपंचायत चे विद्यमानत शिक्षण व विद्युत समिती सभापती भागवत कवडे,शिवसेनेचे नगरसेवक नितीन गवारे,शेतकरी संघटेनचे तालुकाध्यक्ष अॅड.वसंत जगताप,प्रगतशील शेतकरी धनंजय देवाडीकर,व्यापारी संघटेनचे अध्यक्ष मुकुंद शिंगणापुरे, वाशी तालुका कृषी कार्यालयाचे कृषी मंडळ अधिकारी एस.पी. चव्हाण,यांच्यासह परिसरातील शेतकरी कंपनीचे सभासद उपस्थित होते.