आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा योजना:मस्सा (खं) येथे विकासकामांचे लोकार्पण ; भूमिपूजन सोहळा

मस्सा (खं)25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील मस्सा (खं) येथे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील, उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, सरपंच प्रा. राजश्री धनंजय वरपे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत, ज्ञानेश्वर माऊली सभागृह, ज्ञानेश्वर माऊली सभागृह (७ लाख), बाळू मामा मंदिरासाठी सभागृह (७ लाख),जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना, कै चंद्रकांत वरपे शॉपिंग सेंटर लोकार्पण व भूमिपूजन पार पडले.

तद्नंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक बळवंत तांबारे, संजय देशमुख, विश्वजीत नरसिंग जाधव, माजी उपसभापती लक्ष्मणराव अडसुळ, महादेव कांबळे, प्रा. दिलीप पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर बाराते, माजी पंस. सदस्य संगीता शिंदे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...