आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवचलेश्वर देवस्थान:विकासकामांचे उद्घाटन ; दर वर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात

उमरगा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जवळगा बेट येथील शिवचलेश्वर देवस्थानाच्या परिसर विकास कामाचे गुरुवारी (दि.४) राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिप सदस्य प्रा. सुरेश बिराजदार यांच्या उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिग्विजय शिंदे उपस्थित होते.जवळगाबेट येथील शिवचलेश्वर देवस्थान प्रसिद्ध असून दर वर्षी हजारो भाविक यात्रेनिमित्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात. भाविकांची होणारी अडचण लक्षात घेवून जि प सदस्य प्रा. बिराजदार यांनी परिसर विकासाकरिता ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. या निधीतून देवस्थानाच्या ठिकाणी भक्त-भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसराचा विकास करण्यात आला आहे. या विकास कामांचे उद्घाटन गुरुवारी प्रा. बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिपचे माजी समाजकल्याण सभापती शिंदे उपस्थित होते. दरम्यान शिवचलेश्वर देवस्थान समितीच्या वतीने काल्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. यावेळी माजी सरपंच संतराम बिराजदार, सुरेश वाडीकर, राजेंद्र मुकडे, संजय बिराजदार, विजय काळे, वैजनाथ अल्लापुरे, गणेश पाटील, अमोल बिराजदार, रामानंद मुकडे, संभाजी बिराजदार आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...