आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनसुविधा योजना:चौगुलेंच्या हस्ते वडगावात विकासकामांचे लोकार्पण ; मुस्लिम कब्रस्तान बाधण्यात येणार

लोहाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वडगाव (गां) येथील विविध विकासकामांचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते शनिवारी (दि.५) लोकार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी लक्ष्मण भुजबळ होते. शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, तालुकाप्रमुख जगन पाटील, माजी गटनेते अभिमान खराडे, सरपंच बबन फुलसुंदर यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार चौगुलेंच्या विकास निधीतून वडगाव (गां) येथे नळकांडी पुलाची उभारणी (१० लाख), २५/१५ योजनेतून सिमेंट रस्ता करणे (२० लाख), जनसुविधा योजनेतून मुस्लिम कब्रस्तान उभारणी (१० लाख) आदी कामे पूर्ण झाली आहेत. त्याचे लोकार्पण करण्यात आले.

तालुक्यातील ३०६९७ शेतकऱ्यांचे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटीचे १७ कोटींचे अनुदान व २०२० पीकविम्यापोटी शेतकऱ्यांना रक्कम मिळवून दिल्याबद्दल वडगावच्या शेतकऱ्यांनी आमदार चौगुलेंचा सत्कार केला. यावेळी माजी पं. स. सदस्य शंकर पाटील, माजी चेअरमन बिभीषण पवार, दिलीप माळी, अहमद शेख, आनंद ब्याळे, आमिरअली शेख, डॉ. आनंदराव फुलसुंदर, कुर्बान शेख, राजेंद्र माळी, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...