आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:आंतरविद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेचे उद्घाटन ; क्रीडा संचालक यांची होती प्रमुख उपस्थिती

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या उस्मानाबाद झोन च्या ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन तुळजाभवानी स्टेडियम उस्मानाबाद येथे करण्यात आले. या ॲथलेटिक्स स्पर्धेचे उद्घाटन व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रशांत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ. विजय पडवळ, जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.उमेश सलगर,प्रा.डॉ.समीर बाविकर,योगेश थोरबोले यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती.

या क्रीडास्पर्धेमध्ये लांबउडी, उंचउडी, भालाफेक, थाळीफेक, धावणे इत्यादी क्रीडा स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व मेडल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील जवळपास १३० विद्यार्थ्यांचा विविध क्रीडा प्रकारात समावेश होता. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ.विनोदकुमार वायचळ,प्रा.डॉ.जयकुमार शामराज,प्रा.डॉ.महादेव हारगे,प्रा.रवींद्र कुलकर्णी,बाळासाहेब पाटील,प्रा.वैजनाथ गडदे व इतरांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...