आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरगा:पेठसांगवी येथे जिजाऊ ब्रिगेड ग्रामशाखेचे उद्घाटन

उमरगा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून गाव तेथे शाखा अन् गाव तेथे महिला बचत गट उपक्रम राबवण्यात येत असून, तालुक्यातील पेठसांगवी येथे शनिवारी (दि. ३०) बैठकीत विविध उपक्रमांची माहिती देत मान्यवरांच्या हस्ते ग्राम शाखेचे उद्घाटन झाले.

या वेळी लातूर येथील जिजाऊ ब्रिगेडचे उपाध्यक्ष समाधान माने, ग्रामशाखा अध्यक्षा निर्मलाताई देशमुख, उपाध्यक्ष आशाताई मुगळे, उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षा रेखाताई पवार, तालुकाध्यक्ष सत्यवती इंगळे उपस्थित होते. तालुका प्रवक्तेपदी मेघाली जगताप तर संध्या जमालपुरे यांची नाईचाकूर ग्राम अध्यक्ष पदावर नियुक्ती करत नियुक्तीपत्र देण्यात आले.

या वेळी माजी सरपंच गणेश पाटील, संजय माळी, सरपंच सुमन सुभेदार, माधव घोडके, गिरमल दलाल, विनोद देशमुख, सुलभा शिंदे, काशीनाथ पाटील उपस्थित होते. समाधान माने म्हणाल्या की, महिलांनी अति उपवास करु नये, उपवास करायचा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात पुढे राहिले पाहिजे. महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबी जीवन जगावे. जिल्हा उपाध्यक्ष रेखाताई पवार यांनी सूत्रसंचालन केले, तालुकाध्यक्ष सत्यवती इंगळे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...