आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:शहरात महिला आधार आश्रमाचे उद्घाटन

उस्मानाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील तुळजाई महिला सामाजिक विकास मंडळाच्या वतीने सुशीला नगर येथे महिला आधार आश्रम सुरू करण्यात आला. या आश्रमाचा उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमास धर्मादाय कार्यालयाचे न्यायाधीश संजय पाईकराव, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गंगासागरे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे, अॅड. जीनत प्रधान यांच्यासह तुळजाई महिला सामाजिक विकास मंडळाच्या संस्थापक सुवर्णा मुरलीधर कांबळे, अध्यक्षा उषा मुरलीधर कांबळे, उपाध्यक्षा अनुजा प्रज्योत कांबळे, सचिव प्रियंका विशाल काकडे, सहसचिव संगीता विक्रम कदम, कोषाध्यक्ष पूजा विश्वदीप कांबळे, सदस्य बेबीनंदा गाडे यांची उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महिला आधार आश्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मंडळाच्या संस्थापक सुवर्णा कांबळे यांनी महिला आश्रम सुरू करण्यामागील उद्देश सांगताना, महिलांवरील अन्याय, अत्याचार, मानसिक व शारीरिक छळ कमी व्हावा, महिलांना सुरक्षा मिळावी, यासाठी आश्रम स्थापन केल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांनीही महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शहरातील सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...