आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबीरास प्रारंभ:राष्ट्रीय सेवा योजना विशेष‎ हिवाळी शिबीराचे उदघाटन‎

उस्मानाबाद‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्रीपतराव भोसले‎ ज्यु.कॉलेज उस्मानाबाद मधील‎ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या‎ वतीने मौजे. शिंदेवाडी ता.जि.‎ उस्मानाबाद येथे आयोजित विशेष‎ श्रमसंस्कार शिबीरास प्रारंभ झाला.‎ ९ तारखेपर्यंत हे शिबिर चालणार‎ आहेत.‎ या शिबीराचे उद्घाटन गावचे‎ सरपंच निर्मला चंदणे यांच्या हस्ते‎ झाले. कार्यक्रमाची सुरुवात‎ राष्ट्रपिता महात्मा गांधी व‎ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा‎ पूजनाने झाली. शिबीराच्या उदघाटन‎ प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य‎ एस.के. घार्गे यांनी शिबीरातील‎ विद्यार्थी व गावकरी यांना श्रमदानाचे‎ महत्त्व सांगितले.‎

या शिबीर कालावधीत ग्राम‎ स्वच्छता, रस्ते स्वच्छता, गाजर‎ गवत निर्मुलन, वृक्षारोपन, शोषखड्डे,‎ गटार दुरुस्ती, मंदिर सफ़ाई, एड्स‎ जनजागृती, अंधश्रद्धा निर्मुलन व‎ विविध विषयावरील व्याख्याने‎ इत्यादी उपक्रम राबवण्यात येतील‎ असे महाविद्यालयाचे उपप्राचार्य‎ एस.के. घार्गे यांनी सांगितले.‎ या शिबीराच्या उद्घाटनासाठी‎ अध्यक्ष म्हणून निर्मला चंदने, नितीन‎ चंदने उपस्थित होते.

या‎ कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून‎ कला व वाणिज्य विभाग प्रमुख एन.‎ आर. नन्नवरे यांची उपस्थिती‎ लाभली. तसेच मुख्याध्यापक, मगर‎ व सहशिक्षिका शिंदे जि.प. प्राथमिक‎ शाळा, शिंदेवाडी, ग्रामपंचायत‎ सदस्य सोमनाथ चौगुले, महावीर‎ काकडे तसेच सामाजिक कार्यकर्ते‎ विशाल दाते, देवकर पंडित आदींची‎ प्रमुख उपस्थिती होती. सुत्रसंचालन‎ प्रा. घोडके डी. वाय. तर आभार प्रा.‎ पाटील यांनी मानले. प्राचार्य‎ एस.एस. देशमुख व आदित्य पाटील‎ यांनी शुभेच्छा दिल्या.‎

बातम्या आणखी आहेत...