आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवनेरी प्रतिष्ठान आयोजित शिवनेरी चषक भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे सोमवारी (दि. १९) जलसंपदा विभागाचे माजी सचिव व्यंकटराव गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी माजी खासदार प्रा रवींद्र गायकवाड, बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे उपस्थित होते.
यावेळी शिवनेरी प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील विविध क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन नावलौकिक केलेले खेळाडू आर्या वाले (धनुर्विद्या), सोनाली पवार (भालाफेक), मेहराज अत्तार (कबड्डी), हर्षदा चाकूरे (ज्युदो कराटे), साई राठोड (आईस हॉकी), गणेश गालीपल्ली (आईस हॉकी), मोहन राठोड (आईस हॉकी), यशराज चाकूरे (धावपटू), समर्थ पाटील (बुद्धिबळ), निळकंठ माने (राष्ट्रीय नेमबाज) अर्जुन बिराजदार, आर्यन बिराजदार (बॅडमिंटन) खेळाडूंनी यश प्राप्त केल्याने त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडा रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
करंडकातील पहिला सामना इंडियन मेडिकल असोसिएशन विरूद्ध बार असोसिएशन यांच्यात झाला. यावेळी युवानेते किरण गायकवाड, भाजप कार्यकारिणी सदस्य संताजी चालुक्य, युवा नेते हर्षवर्धन चालुक्य, भाजप तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, डॉ. मल्लिनाथ मलंग, कंत्राटदार सुनील माने, बसवराज वरनाळे, बाबुराव शहापुरे, तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, सागर शिंदे, जगन पाटील, माऊली प्रतिष्ठानचे उमाकांत माने, माजी नगरसेवक अभिमान खराडे, ॲड. प्रवीण तोतला, सिद्रामप्पा चिंचोळे, माजी नगराध्यक्ष धनंजय मुसांडे, माजी नगराध्यक्ष हंसराज गायकवाड, माजी नगरसेवक संजय पवार, उमरगा व्यापारी महासंघ अध्यक्ष रणधीर पवार, सुधाकर पाटील, शहरप्रमुख राजेंद्र सूर्यवंशी, रोटरी अध्यक्ष अजित गोबारे, विलास भगत, डॉ. प्रशांत मोरे, पोलिस निरीक्षक मनोज राठोड, संतोष सगर, वहाब अत्तार, बालाजी पाटील, क्रीडा शिक्षक अंकुश औरादे, संजय कोथळीकर, राष्ट्रीय खेळाडू रणजीत ठाकूर, क्रीडा शिक्षक सुरेंद्र वाले, अरुण जगताप, ज्ञानेश्वर माऊली, सचिन जाधव, बापूराव गायकवाड, रत्नाकांत सगर, योगेश तपसाळे, गोपाळ जाधव, ज्ञानेश्वर सांगवे, मुजीब इनामदार, साठे यांच्यासह शिवनेरी प्रतिष्ठान, विविध पक्ष व संघटनेचे प्रमुख व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
विविध स्पर्धांमध्ये युवकांचा सहभाग असणे आवश्यक
माधव जाधव आणि युवराज गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. शहर व ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना क्रिकेटची संधी उपलब्ध करून देण्यासाठी, होतकरू व प्रतिभावान शहरी व ग्रामीण खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी एका व्यासपीठाची गरज होती.
युवकांनी विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मैदानावर आले पाहिजे, असे मत युवानेते किरण गायकवाड यांनी व्यक्त केले. अशा स्पर्धांच्या माध्यमातून युवकांचा उत्साह वाढतो तसेच केवळ खेळाडूच नव्हे तर संघातील पंच, तसेच मैदान तयार करणारे यांच्या कौशल्यालाही वाव मिळतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.