आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाचे माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने उस्मानाबाद तालुक्यातील चिखली येथे राज्यस्तरीय किशोर-किशोरी अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन रविवारी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या पुढाकाराने चिखली येथील पांडुरंग मंगल कार्यालयासमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, महेंद्र धुरगुडे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश एखंडे, तालुका कार्याध्यक्ष प्रमोद वीर, विधानसभा अध्यक्ष अमित शिंदे, युवक पदाधिकारी संगीता काळे, श्वेता दुरूगकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परंड्याचे पदाधिकारी कातुरे पाटील, जिल्हा परिषद सदस्य माजी सदस्य ज्ञानेश्वर गीते, चिखलीचे सरपंच, कबड्डीचे बंडू सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव देणार्या या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आमदार मुंडे यांनी सक्षणा यांचे कौतुक केले. स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याबद्दल सलगर यांनी विद्यार्थी व प्रशिक्षकांचे आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.