आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांच्या समस्या:क्रीडा कार्यालयात भांडारगृहाचे उद्घाटन ; क्रीडा दिनानिमित्त क्रीडा शिक्षकांचा सत्कार

बार्शीटाकळी25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुस्तमाबाद येथे जिल्हा क्रीडा कार्यालया अंतर्गत भंडारगृह बांधकामाचे उद्घाटन आमदार वसंत खंडेलवाल यांच्या हस्ते केले. अध्यक्षस्थानी प्रा. तुकाराम बिरकड हाेते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उपलवार, क्रीडा तालुका अधिकारी यादव क्रीडा मार्गदर्शक चारुदत्त नाकट, गजेंद्र काळे, शत्रुघ्न बिरकड, दिगंबर म्हैसने, सुधाकर खुमकर, दिनकर गायकवाड, सुभाष वाघ उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष तुकाराम बिरकड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी उपालवार, तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मी शंकर यादव, जिल्हा क्रीडा निरीक्षक नाकट यांचा सत्कार केला. याप्रसंगी क्रीडाशिक्षकांचा क्रीडा दिनानिमित्त क्रीडा विभागातर्फे सत्कार केला. याप्रसंगी बजरंग विद्यालयामधील स्काऊट विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार खंडेलवाल यांच्या हस्ते केला. याप्रसंगी गजेंद्र काळे यांनी क्रीडा शिक्षकांच्या समस्या मांडल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी उपलवार यांनी क्रीडा विभागाच्या योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक लक्ष्मीकांत यादव यांनी केले. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक संजय मैंद यांनी केले. आभार जगत जीवन पल्हाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यालयामधील दीपक गोल्डे, आत्माराम राठोड, कैलास देवबाले, दीपक सांगळे, राजेश आमले, अमोल शेळके, पुष्पा गोल्डे, रेखा डामरे, माधव जाऊलकर, प्रमोद टोबरे, उमाळे येखंडे, मधुकर गोंडचावर, केशव पिंपळकर, भास्कर राऊत आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...