आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूर:स्वस्तिक सरस्वती पार्कचा तुळजापुरात शुभारंभ

तुळजापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन बसस्थानक, बाजार समिती आणि भाजी मंडई पासून जवळ च शहराच्या मध्यवर्ती भागात “स्वस्तिक सरस्वती पार्क” या शहरातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचा शुभारंभ गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्तावर औशाचे आ. अभिमन्यू पवार यांचे पिताश्री ह.भ.प. दत्तात्रय पवार गुरुजी यांचा हस्ते करण्यात आला आहे. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत उस्मानाबाद जिल्हा मजूर फेडरेशन चे अध्यक्ष नारायण नन्नवरे, तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन शिवाजी बोदले व युवा उद्योजक दिनेश अग्रवाल यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक अमर मगर, सचिन पाटील, विजय कंदले, पंडीत जगदाळे, बालाजी बंडगर, प्रा. संभाजी भोसले, पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, दुर्गादास अमृतराव, प्रशांत कदम, बापुसाहेब अमृतराव, अजिंक्य नन्नवरे सह मान्यवरांची उपस्थिती होती.

कृषी उत्पन्न बाजार समिती च्या पाठिमागे हंगरगा रोड वर सर्व्हे नंबर १८४ मध्ये ०४ एकर जागेत भव्य गृह प्रकल्प साकारत आहे. यामध्ये १ बी एच के, २ बी एच के, ३ बी एच के, ४ बी एच के घरे उपलब्ध असणार आहेत. अंतर्गत सिमेंट रस्ते, स्ट्रीट लाईट, बगीचा आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. गृह प्रकल्प क्षेत्रातील बिल्डर दिनेश अग्रवाल यांच्या या नवीन गृहप्रकल्पा विषयी उत्सुकता आहे.

बातम्या आणखी आहेत...