आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किर्तन सोहळा:जीवनाच्या कल्याणासाठी संतांचा अवतार : बोराडे महाराज

परंडा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी जीवनाच्या कल्याणासाठी संतांनी अवतार घेतला आहे, असे मत बालाजी महाराज बोराडे यांनी व्यक्त केले. शहरातील स्वामी समर्थ परिसरात स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तन सेवेत ते बोलत होते.

त्यांनी कीर्तनातून संतांच्या संगतीचे महात्म्य सांगितले. जीवनात सर्वात उत्तम संगती ही संतांची आहे. संतांच्या संगतीत मानवी जीवनाचे कल्याण आहे. संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी संत विचार घराघरापर्यंत पोहचले पाहिजेत. लहान मुलांना संतांच्या विचारांचे बाळकडू पाजावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, नगरसेवक सुबोधसिंह ठाकूर, उद्योजक सुरेश कात्रेला, विकास कुलकर्णी, पुरुषोत्तम महाराज गजरे, संदीप महाराज पाटील, भाग्यवान महाराज रोडगे, नाना महाराज रोडगे, तात्या महाराज हजारे, वैभव महाराज खोसे, मधुकर भांडवलावर, नाना गवारे, मुकुंद देशमुख, अरुण बुरांडे, गोपाळराव पाटील, हनुमंत विटकर, दिपक थोरबोले, शाम पाटील, बळीराम कोळी, आप्पा भोरे अंकुश जमदाडे, सुमित कठारे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...