आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात दोन वर्षांपासून मुबलक पावसामुळे उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, जून महिना वगळता ऑक्टोबरपर्यंत सतत पाऊस व ढगाळ वातावरण होते. यामुळे ऊस पिकाला आवश्यक सूर्यप्रकाश मिळाला नाही. यामुळे ऊसाची अपेक्षित वाढ झाली नाही. याचा साखर उताऱ्याबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नालाही फटका बसला आहे. परिणामी, उसाच्या उत्पन्नात ३० टक्क्यांपेक्षा अधिकची घट झाल्याचे दिसून येत आहे.
उमरगा तालुक्यात खोडव्याचे जास्त प्रमाण असल्याने चालू गाळप हंगामात हेक्टरी ऊस उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट होत आहे. यामुळे मार्च अखेरपर्यंत साखर कारखाने बंद पडतील, अशी शक्यता दिसून येत आहे. शिवाय साखर कारखान्यांची वाढलेली संख्या, सहकारी कारखान्यांचा राजकारणासाठी वापर, मजुरांची टंचाई, तोडणी मुकादमाकडून होणारी आर्थिक व न येण्याची फसवणूक, सरकारचे सहकारविरोधी धोरण, अशी असंख्य अडथळ्यांची शर्यत पार करताना सहकारी साखर कारखाने आता डबघाईला येत आहेत. यातच ऊस मजुरांच्या टंचाईमुळे कारखानदार बेजार झाले आहेत. यावर उपाय म्हणून तोडणी यंत्रांची संख्या वाढली आहे. जमिनीतील ओलाव्याने काही ठिकाणी तोडणी यंत्राचा उपयोग होणार नसून वाहनासह बैलगाडीतून उस वाहतूक करण्यास अडचणी येत आहेत. १५ आॅक्टोबरनंतर यंदाचा गाळप हंगाम सुरू झाला. एफआरपीनुसार दर देणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात सहकारी आठ तर खासगी आठ साखर कारखाने आहेत.
यापैकी तेरणा कारखाना बंद आहे. चालू हंगामात उमरगा-लोहारा तालुक्यातील विठ्ठलसाई आणि भाऊसाहेब बिराजदार तर लोहारा तालुक्यातील लोकमंगल हे साखर कारखाने सुरू आहेत. विठ्ठलसाई आणि भाऊसाहेब हे दोन कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.
उमरगा तालुक्यात मागील दोन-तीन वर्षात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. मागील वर्षीच्या हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. चालू हंगामात अनेक कारखाने सुरू होत आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक वाहनांची व मजुरांची मागणी वाढली आहे. परंतु त्या प्रमाणात वाहने व मजूर उपलब्ध होत नसल्याने अडचण येत आहे.
वाहनासह बैलगाडीतून उस वाहतूक करण्यास अडचणी येत आहेत. १५ आॅक्टोबरनंतर यंदाचा गाळप हंगाम सुरू झाला. एफआरपीनुसार दर देणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात सहकारी आठ तर खासगी आठ साखर कारखाने आहेत. यापैकी तेरणा कारखाना बंद आहे. चालू हंगामात उमरगा-लोहारा तालुक्यातील विठ्ठलसाई आणि भाऊसाहेब बिराजदार तर लोहारा तालुक्यातील लोकमंगल हे साखर कारखाने सुरू आहेत.
विठ्ठलसाई आणि भाऊसाहेब हे दोन कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. उमरगा तालुक्यात मागील दोन-तीन वर्षात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. मागील वर्षीच्या हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. चालू हंगामात अनेक कारखाने सुरू होत आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक वाहनांची व मजुरांची मागणी वाढली आहे. परंतु त्या प्रमाणात वाहने व मजूर उपलब्ध होत नसल्याने अडचण येत आहे.
उसाच्या उत्पादनात ३० टक्क्यांची घट
यंदाच्या वर्षात तालुक्यासह जिल्हाभरात वार्षिक सरासरीपेक्षा सर्वाधिक पाऊस झाला आहे. दोन-अडीच महिन्यात झालेला सततचा पाऊस अन् दोनवेळा अतिवृष्टी झाल्याने ऊस पिकाला सूर्यप्रकाश कमी मिळाला आहे. यामुळे ऊस पिकाची वाढ खुंटली असून साखर उताऱ्याबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ३० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.
कारखाने वाढले, ऊस तोड मजुरांची संख्या घटली कारखाने वाढले तरी मजुरांची संख्या वाढली नाही. अनेक कारखान्यांना उसाची तोडणी करण्यासाठी मजुरांची कमतरता भासत आहे. मजुरांच्या मुलांनी ऊसतोडीकडे पाठ फिरवली. महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेशात मजूर पुरवठा करणाऱ्या बीड जिल्ह्यात मजुरांच्या संख्येत घट झाली. कारखान्यांसोबत करार करून अनामत घेतलेल्या नांदेड जिल्ह्यात मुखेड भागात मुकादम व मजुरांनी कारखान्यांकडे पाठ फिरवली आहे.
परिणामी, बहुतांश कारखान्यांना पूर्ण क्षमतेने गाळपासाठी ऊस पुरवठा होणे अशक्य आहे. मजुरांच्या कमतरतेवर ऊसतोडणी यंत्र चांगला पर्याय असला तरी यासाठी चार फुटाची सरी असणे गरजेचे आहे. साखर कारखान्यांनी आपल्या भागातील उत्पादक शेतकऱ्यांत जागृती करणे गरजेचे आहे. तालुक्यात तीन व साडेतीन फूट सरीचे प्रमाण अधिक आहे. यामुळे ऊस तोडणी यंत्राला ऊस तोडणीसाठी अडचण येत आहे.
गतवर्षी ६ एकरात २५० क्विंटल तर यंदा फक्त १८० क्विंटल ऊस
यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना अनेक संकटातून जावे लागत आहे. गतवर्षी सहा एकर क्षेत्रात साधारणत: अडीचशे क्विंटल ऊस निघाला होता. यंदा अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे उसाची वाढ खुंटली असून १८० क्विंटल म्हणजे ३० टक्के उत्पन्नात घट झाली आहे. -पप्पू सूर्यभान कदम, मानेगोपाळ.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.