आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउमरगा शहरासह परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास शहरातील मलंग प्लॉट येथून दुचाकी लंपास केल्याची घटना घडल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरातील मलंग प्लॉट येथील वृंदावन नगर येथून शनिवारी रात्री प्रा युसूफ मुल्ला यांच्या घरासमोरून हॅन्डल लॉक तोडून होंडा शाईन दुचाकी (क्र. एम एच २५ वाय ०४०४) चोरट्यांनी पळविली. यापूर्वी शहरातील औटी गल्ली येथील गुंडाजी सुर्यवंशी यांनी घरासमोर शाईन होंडा दुचाकी (क्र. एम एच २५ ए ई ९०२३) हॅन्डेंल लॉक करून ठेवली होती.
अज्ञात व्यक्तीने लॉक तोडुन दुचाकी चोरून नेली. दुचाकी मालक सुर्यवंशी यांनी पोलिसात याची माहिती दिली आहे. शिवपुरी येथील राम नागदे यांचे घरासमोरून स्पेलंडर प्लस दुचाकी (क्र.एम.एच.२५ ई २२५४) चोरट्यांनी पळविली. शनिवारी रात्री प्रा. युसुफ मुल्ला यांची दुचाकी चोरल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी रात्री ११:३० ते १२ :०० दरम्यान तीन चोरट्यांनी शेजारीच असणाऱ्या माजी सैनिक दत्तु वडदरे यांच्या घरासमोरील पाच दुचाकीचे पेट्रोल चोरुन घेऊन गेले. रात्री साडे अकरा पासुन चोऱ्या होत असल्याने नागरीकांत घबराट पसरली आहे. शहरातील ५० टक्के पोलिस या भागात वास्तव्यास आहेत. वृंदावन नगर येथून शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे पुलावर तळीरामांनी रोज संध्याकाळपासुनच दारूचा अड्डा थाटला आहे.
त्यामुळे याभागात राहणाऱ्या महिलांना इतर रस्त्याने जावे लागत आहे. हा रस्ता शाळेकडे जाणारा असुन यावर दारुड्यांची संख्या दिवसंदिवस वाढत आहे. तसेच रस्त्यावर युवकांचा ठिल्लरपणा वाढला आहे. या रोडवरून शालेय विद्यार्थ्यांना आपला जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने याकडे गांभिर्याने घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
नागरिकांत भितीचे वातावरण, चोरटे कधी पकडणार?
या भागातून पेट्रोलींग नसल्याने चोरट्याचे धाडस वाढत आहे. भागातील नागरीक सुशिक्षीत असुन नागरींकासाठी पोलिस ठाण्याचे सुरक्षितता महत्वाची आहे. चोरट्यांनी पत्रकाराची दुचाकी चोरली तर पोलिसांच्या गाडीतील पेट्रोल चोरल्याने नागरीकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आठवड्यापुर्वी सुविधा हॉस्पिटल शेजारी भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र झोला मारून नेल्याची घटना घडली.
वाहने, दुचाकी, पेट्रोल चोरी आणि भुर्ट्या चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरासह परिसरात नागरीकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या अशा गुन्हेगारांना पोलिस कधी अटक करणार ? गुन्हे दाखल करण्यात येत आहेत ? शोध घेतला जातो पण अशा गुन्हेगारांना अटक करून कारवाई कधी होणार असा प्रश्न नागरीकातून उपस्थित होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.