आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत कळंब तालुक्यातील आयकरदाते व अपात्र लाभार्थ्यांकडे ६८ लाख ४४ हजार रुपयांची वसुली पात्र रक्कम थकली आहे. परंतु वरिष्ठ पातळीवर वारंवार सूचना देऊनही ही रक्कम वसूल होत नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे.
कळंब तालुक्यातील ३९,९१६ शेतकऱ्यांनी सन्मान योजनेकरिता पोर्टलवर माहिती अपलोड केली होती. यातील आयकर भरणारे ९२८ व २३१ अपात्र लाभार्थी, असे एकूण ११५९ जणांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा घेतल्याचे उघड झाले होते. किसान सन्मान योजनेंतर्गत छोट्या शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्यात येते. ठरावीक ठप्प्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. या योजनेचा लाभ कोणते घटक घेऊ शकतात ही नियमावलीही तयार करण्यात आली होती.
परंतु या योजनेसाठी पात्र नसतानाही अनेकांनी नोदणी करत योजनेचा लाभ घेतला. अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यावर प्रशासनाने अशा लाभार्थ्यांची पडताळणी केली. यातून लाभ घेतलेल्या अपात्र लाभार्थ्यांना नोटीस बजावण्यात आल्या. परंतु या अपात्र लाभार्थ्यांपैकी काहींनी उचललेला हप्ता परत केला तर काहींनी अद्यापही रक्कम भरली नाही. त्यामुळे अशा लाभार्थ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.